महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अबब! एकाच घरी आढळेल तब्बल 3 विषारी नाग साप - डॉ. प्रशांत फुलझले

तब्बल पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर सर्प मित्रांच्या मदतीने या तिन्ही सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

staggering 3 venomous snakes can be found in one house
अबब! एकाच घरी आढळेल तब्बल 3 विषारी नाग साप

By

Published : Mar 19, 2021, 9:48 PM IST

भंडारा - भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात एकाच घरी तब्बल तीन जहाल विषारी नाग प्रजातीचे साप आढळल्याने घर मालकाची भांबेरी उडाली होती. तब्बल पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर सर्प मित्रांच्या मदतीने या तिन्ही सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

पालांदूर येथील राहत्या घरात मिळाले नाग-

लाखनी तालुक्यातील पालांदुर गावातील ब्राम्हण मोहल्ल्यातील डॉ. प्रशांत फुलझले यांच्या राहत्या घरी हे नाग दिसले. फुलझेले यांच्या घराच्या परिसरात सुरूवातीला एक साप दिसला जवळपास पाच ते सहा फूट लांबीचा हा साप घरच्यांना दिसल्यानंतर त्या सापाला पकडण्यासाठी सुरुवातीला गावातील लोकं पोहचले. या सापाला पकडण्याचे प्रयत्न सुरू असतांनाच पुन्हा एक दुसरा त्याच लांबीचा साप परिसरातील दुसऱ्या भागात दिसला. या दोन सापांना कसे पकडावे याची योजना सुरू असतानाच नागरिकांना पुन्हा तिसरा साप दिसला. आता मात्र नागरिकांची भांबेरी उडाली. या तिन्ही सापांना पकडणे अतिशय अवघड असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सर्प मित्राला हे साप पकडण्यासाठी बोलावले.

अबब! एकाच घरी आढळेल तब्बल 3 विषारी नाग साप
तब्बल पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर साप पकडण्यात यश-लाखनी वरून सर्पमित्र पोहचल्यानंतर पहिला साप शोधण्याचे काम सुरू झाले. मात्र काही केल्या तो साप दिसत नव्हता शेवटी एका झुडपांमध्ये हा साप आढळून आला. त्या सापाला बाहेर काढल्या नंतर हा नाग जातीचा साप असल्याचे लक्षात आले. त्यानंतर जमिनीत खड्डा करून लपलेला दुसरा साप शोधून काढण्यात आला. मात्र तिसरा शोधण्यासाठी सर्पमित्रांना बराच कालावधी लागला कारण तो शेतीच्या मोठ्या मातीत लपलेला होता. त्यामुळे त्याला शोधण्यासाठी सरतेशेवटी जीसीपी बोलविण्यात आली आणि हळुवार जेसीबीच्या मदतीने हळुवारपणे जागा खोदत त्या सापाला शोधून काढण्यात आले. तिनेही अतिशय विषारी नाग जातीचे पाच ते सहा फूट लांब साप होते.डॉक्टरांनी काहीच महिने अगोदर गावालगत असलेल्या त्यांच्या शेतात हे घर बांधले होते. त्यामुळे घराच्या बाजूला उर्वरित जागेत हे नाग त्यांचा अधिवास करीत असावे जे आज घरातील लोकांना दिसले असावे. हे नाग जहाल विषारी होते त्यामुळे जर चुकून या नागांना घरच्या व्यक्तीचा त्रास झाला असता तर अनर्थ होऊ शकला असता. मात्र सुदैवाने या तिन्ही नाग सापांना पकडून रेस्क्यू करत किटाळी येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details