महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

३३ कोटी रुपये खर्चून उभारलेली पाणीपुरवठा योजना २० वर्षापासून धुळखात; २३ गावे तहानलेलीच

२० वर्षांचा मोठा कालखंड लोटुनही २३ गाव आजतागत पिण्याच्या पाण्यापासुन वंचित राहीले आहेत. या योजनेसाठी ३३ कोटी रुपयांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमार्फत करण्यात आली आहेत. मागील वर्षी लोकसभा पोटनिवडणूक पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या ३ महिने या योजनेतून त्या २३ गावांना पाणी देण्यात आले.

३३ कोटी रुपये खर्चून उभारलेली पाणीपुरवठा योजना २० वर्षापासून धुळखात; २३ गावे तहानलेलीच

By

Published : May 14, 2019, 6:00 PM IST

भंडारा - महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत तुमसर तालुक्याच्या गोबरवाही क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजना असतानाही मागील २० वर्षापासून ती २३ गावे तहानलेलीच आहेत. या योजनेची सुरूवात सन १९९८ मध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ३३ कोटी रुपयेची तरतूद करुन केली होती. मात्र, त्यानंतर मागील वर्षी भंडारा लोकसभा पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या योजनेतून अवघे ३ महिने पाणीपुरवठा करण्यात आला. यामुळे सध्या ३३ कोटी रुपये खर्चून उभारलेली योजना असूनही ती २३ गावे अद्याप तहानलेलीच आहेत.

याविषया बोलताना स्थानिक...


राजीव सागर बावनथंडी प्रकल्पाला जोडुन गोबरवाही, पवनारखारी, गणेशपुर, येदरबुची, सुंदरटोला, या परीसरातील इतर आदिवासी बहुल गावांना या योजनेतुन पाण्याचा पुरवठा केला जाणार होता. यासाठी १९९८ साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या योजनेचा पाया रचला गेला. मात्र २० वर्षांचा मोठा कालखंड लोटुनही २३ गाव आजतागत पिण्याच्या पाण्यापासुन वंचित राहिले आहेत. या योजनेसाठी ३३ कोटी रुपयांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमार्फत करण्यात आली आहेत. मागील वर्षी लोकसभा पोटनिवडणूक पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या ३ महिने या योजनेतून त्या २३ गावांना पाणी देण्यात आले.
सद्या कंत्राटदार व शासनाच्या मध्यस्थी आर्थिक व्यवहारात तफावत निर्माण झाल्यामुळे पाणी पुरवठ्याची 'ती' योजना गेल्या २० वर्षापासून बंद अवस्थेत आहे. तुमसर तालुक्यातील गोबरवाही क्षेत्रातील त्या २३ गावांना योजनेपासुन पाणी मिळालेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.


यासंदर्भात वारंवार पत्र व्यवहार करुनही शासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्या २३ गावांना भुमीगत पाणी पुरवठा करणा-या वाहिन्या, ठिकठिकाणी नळ बांधणी, आलेसुर येथे जलशुद्धीकरण केंद्र , बावनथडी प्रकल्पात योजनेचे नियोजीत पंप हाऊस व इतर महत्वाची कामे पुर्ण असुन सुद्धा ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाची ही योजना केवळ पांढरा हत्ती ठरत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशाकीय अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे आज शासनाचा ३३ कोटींचा प्लांट धूळखात अवस्थेत पडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details