बुलडाणा - पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील यवतमाळ येथे कार्यक्रमासाठी येतात. मात्र, त्यांना यवतमाळपासून जवळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात येऊन वीरमरण आलेल्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे, त्यांची भेट घेणे हे महत्वाचे वाटले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. ते बुलडाणा येथे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मोदींना वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेणे महत्वाचे वाटत नाही - पवार - army
पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील यवतमाळ येथे कार्यक्रमासाठी येतात. मात्र, त्यांना यवतमाळपासून जवळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात येऊन वीरमरण आलेल्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे, त्यांची भेट घेणे हे महत्वाचे वाटले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. ते बुलडाणा येथे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार
यावेळी मंचावर प्रा. जोगेंद्र कवाडे, मुकुल वासनिक, रविकांत तुपकर, आमदार राहुल बोन्द्रे, हर्षवधन सपकाळ, माजी आमदार दिलीप सानंदा, अॅड. नाजीर काजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मोदी सांगतात छप्पन इंचाची छाती आहे. मग अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेला कुलभूषण जाधव यांना भारतात आणायची हिम्मत दाखवली का? असा सवाल पवार यांनी यावेळी केला. आमचे सरकार आल्यास, शेतकऱ्यांच्या विकासाबरोबर राफेलची देखील चौकशी करणार असल्याचे पवार म्हणाले.