भंडारा - आम्हाला दुसऱ्याच्या घरात झाकुन पाहण्याची सवय नाही. असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी भंडाऱ्यात केले आहे. शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात गेले असल्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तर भाजपा खासदार अनिल बोंडे ( MP Anil Bonde ) काय बोलतात त्यांच्या बोलण्यात काही तारतम्य नाही असे खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे. ते आज भंडारा जिल्ह्यात ( Nana Patole today in Bhandara ) आले असतांना बोलले.
आपल्या विधानसभा क्षेत्रात पाहणी साठी आले होते.मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस येत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंगळवारी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आले होते. या दरम्यान माध्यमांनी त्यांना सध्या शिवसेनेत सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर प्रश्न विचारले असता आम्हाला दुसऱ्यांच्या घरात झाकून पाहण्याची सवय नसून कोणाकडे काय सुरू आहे. हे बघण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे ( Attention To The Public Questions Nana Patole ) महत्वाचे आहे. सध्या राज्यामध्ये कोणाचे किती आमदार फोडायचे कोणाचे किती आमदार विकत घेण्याची परंपरा सुरू झाली आहे. ही संविधानामध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडली नव्हती. लोकशाही मध्ये जनतेचे प्रतिनिधी जनतेचे काम करणारे असावे अशी भूमिका त्यांनी मांडली होती आणि म्हणून काँग्रेस पक्ष या अडचणीच्या वेळेस जनतेच्या पाठीशी राहून त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवत राज्यात सुरू असलेली राजकीय उलथापालथ दूर ठेवून लोकांच्या मदतीसाठी मी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.