महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैशाची भूक...  स्वस्त दरात खरेदी केलेल्या धान्याची व्यापाऱ्याला जास्त दराने विक्री - nagsen ramteke

रेशन कार्डधारकांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ प्रमाणे दर महिन्याला धान्य मिळते. काही मोजके अतिशय गरीब कुटुंबातील लोकच रेशन दुकानातील धान्य वापरतात. उर्वरित 60 टक्के नागरिक हे धान्य 17 ते 18 रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे व्यापाऱ्यांना विकत असल्याचे प्रकार घडत आहेत.

people resale their ration grain to traders in bhandara
रेशन कार्डधारक नफा कमविण्यासाठी, त्यांचे धान्य विकतात व्यापाऱ्याला

By

Published : Apr 22, 2020, 9:37 AM IST

Updated : Apr 22, 2020, 11:17 AM IST

भंडारा-रेशन दुकानातील धान्य कमी दरात खरेदी करून हे धान्य व्यापाराला जास्त दरात विकण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. असाच एक प्रकार पुढे येताच लाखनीच्या तहसीलदारांनी धान्य खरेदी करणाऱ्या व्यापारी आणि विकणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. खरेदी केलेला सर्व तांदूळ जप्त करण्यात आला आहे. हा खरेदी-विक्रीचा प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू असल्याचे दिसून येते.

पैशाची भूक... स्वस्त दरात खरेदी केलेल्या धान्याची व्यापाऱ्याला जास्त दराने विक्री

लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/टोली येथील नागसेन हरिभाऊ रामटेके (39) वर्ष हा मागील कित्येक वर्षांपासून रेशन दुकानावरील धान्य कार्ड धारकांकडून जास्त दराने खरेदी करण्याचा व्यवसाय करतो आहे. याची माहिती मिळतात लाखणी तहसीलदार मल्लिक विराणी यांनी रामटेके यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता तिथे हा खरेदी-विक्रीचा व्यवहार होताना दिसला, त्यामुळे त्यांनी लगेच याची तक्रार पोलिसात करून धान्य सील करून घेतले. रामटेके याने जवळपास 70 लोकांकडून 1100 किलो तांदूळ खरेदी केला होता.

रेशन कार्डधारकांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ प्रमाणे दर महिन्याला धान्य मिळते. काही मोजके अतिशय गरीब कुटुंबातील लोकच रेशन दुकानातील धान्य वापरतात. उर्वरित 60 टक्के नागरिक हे धान्य 17 ते 18 रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे व्यापाऱ्यांना विकतात. प्रत्येक गावात हे धान्य खरेदी करणारे व्यापारी उपलब्ध असतात.

रेशन कार्ड धारकांकडून खरेदी केलेला हा माल हे छोटे व्यापारी मोठ्या व्यापाऱ्यांना किंवा राईस मिलर्सना विकतात. राईस मिलर्स हा तांदूळ इतर राज्यात पॉलिश करून जास्त दराने विकतात किंवा शासनाकडून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रातील धान तांदूळ बनून देतांना हा तांदूळ पुन्हा शासनाला देतात. त्यामुळे हे एक मोठा रॅकेट असून गरजवंताला मिळणाऱ्या धान्याचा होणारा काळा बाजार थांबविणे गरजेचे आहे. तसेच ज्या लोकांना या धान्याची गरज नाही त्यांनी आपले कर्तव्य जाणून हे धान्य घेणे बंद केले पाहिजे.
कोणीही गरीब उपाशी पोटी झोपू नये म्हणून शासन नाममात्र दरात हे धान्य नागरिकांना देते. यासाठी शासन अब्जाधीश रुपये दरवर्षी खर्च करतो किमान शासनाच्या चांगल्या उद्देशाला नागरिकांनी विचार करावा, असे तहसीलदारांनी आवाहन केले आहे.

Last Updated : Apr 22, 2020, 11:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details