महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार चरण वाघमारे यांची परिणय फुकेंनी घेतली जेलमध्ये भेट

विनयभंगाच्या प्रकरणात तुमसर विधानसभा मतदार संघातील आमदार चरण वाघमारे यांना अटक झाली आहे. त्यांची पालकमंत्री परिणय फुके आणि खासदार सुनील मेंढे यांनी जेलमध्ये भेट घेतली. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करू असे परिणय फुके यांनी सांगितले.

आमदार चरण वाघमारेंची परिणय फुकेंनी घेतली जेलमध्ये भेट

By

Published : Sep 30, 2019, 8:41 PM IST

भंडारा- विनयभंगाच्या प्रकरणात तुमसर विधानसभा मतदार संघातील आमदार चरण वाघमारे यांना अटक झाली आहे. त्यांची पालकमंत्री परिणय फुके आणि खासदार सुनील मेंढे यांनी जेलमध्ये भेट घेतली. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांना सांगून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करू, असेही परिणय फुके यांनी सांगितले. आमदारांच्या अटकेनंतर भंडारा जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणाला जातीय वळण देत तेली समाजाचे काही नेते आमदार चरण वाघमारे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी खोटा आरोप लावून खोटी चौकशी केल्याच्या आरोपानंतर पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

आमदार चरण वाघमारेंची परिणय फुकेंनी घेतली जेलमध्ये भेट

हेही वाचा-आयएनएक्स मीडिया प्रकरण : चिदंबरम यांची जेलवारी कायम, पुन्हा फेटाळला जामीन अर्ज

नामांकन अर्ज भरण्याच्या कालावधीतच तुमसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चरण वाघमारे यांचे अटकसत्र आणि जेलमध्ये रवानगी हे त्यांच्याच पक्षातील लोकांनी केलेला षडयंत्र असल्याचे घणाघाती आरोप आमदार चरण वाघमारे यांनी केला होता. तसेच माझ्यावर लावलेले आरोप आणि झालेली चौकशी ही चुकीची असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर मागच्या दोन दिवसात विविध घडामोडी घडल्या. तेली समाजाच्या आमदारावर मुद्दाम अन्याय केला जात आहे, असे सांगत तेली समाजाचे काही नेते आमदाराच्या पाठीशी उभी राहिली. भाजप पक्षातही वेगवेगळ्या विषयांवर मागील दोन दिवसात भंडारा आणि नागपूरमध्ये चर्चा सत्र झाले. त्यानंतर सोमवारी सकाळी पालकमंत्री परिणय फुके आणि खासदार सुनील मुंडे यांनी आमदार चरण वाघमारे यांची जेलमध्ये भेट घेऊन पुढच्या वाटचाली विषयी चर्चा केली. सुरुवातीला आमदार चरण वाघमारे यांनी जामीन घेण्यास नकार दिला होता. मात्र, परिणय फुके यांच्या भेटीनंतर वाघमारे यांनी जामीन घेण्यास तयारी दाखविली असल्याचे फुके यांनी सांगितले. तसेच या प्रकरणानंतरही तुमसर विधानसभेची उमेदवारी त्यांनाच मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँक सलग पाचव्यांदा ४ ऑक्टोबरला रेपो दरात कपात करण्याची शक्यता

या सर्व राजकीय डावपेचात त्या महिला उपनिरीक्षकाचे आणि पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत तर नाही ना याचाही विचार केला पाहिजे. महिला उपनिरीक्षकांचे विनयभंग आरोप खरेच खोटे होते का? पोलिसांनी आपली अब्रू वाचविण्यासाठी खोटी चौकशी केली का? या सर्व अधिकाऱ्यांना सत्ताधारी आमदार विरुद्ध खोटी चौकशी करून अटक केल्यास त्याचा दुष्परिणाम भविष्यात होऊ शकतो याची कल्पना नाही का? असे बरेच प्रश्न चर्चेत आहेत. विनयभंगाच्या आरोपानंतर भाजपची निवडणुकीत अब्रू जाईल म्हणून भाजप आता पोलिसांनाच कटघऱ्यात उभे करू पाहत आहे. यासर्व प्रकारानंतरही भाजपचा आमदारांच्या पाठीशी राहून त्यांनाच उमेदवारी देते की नैतिक जवाबदारी पाळत यांची उमेदवारी नाकारत इतरांना उमेदवारी देते याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details