महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात वीज बिल संकलन करणाऱ्या पतसंस्थेकडून 44 लाखांचा अपहार, तक्रार दाखल - MSEB bhandara

महावितरणाच्यावतीने ग्राहकांचे घरगुती वीज बिल हे महावितरणच्या कार्यालय व्यतिरिक्त बँक, पतसंस्था अशा ठिकाणीही भरता येते. अशाच प्रकारे भंडाऱ्यात वीज बिल भरण्यासाठीची व्यवस्था शहरातील लक्ष्मी महिला नागरी पतसंस्था येथे करण्यात आली होती. मागील कित्येक वर्षांपासून नागरिक येथे वीज बिलाचा भरणा करतात.

भंडारा bhandara
लक्ष्मी महिला नागरी पतसंस्था भंडारा

By

Published : Feb 29, 2020, 7:55 AM IST

भंडारा - शहरातील लक्ष्मी महिला नागरी पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. महावितरणच्या वतीने भंडारा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे. पतसंस्थेत नागरिक वीज बिल भरत असे. मात्र, ग्राहकांनी भरलेल्या वीज बिलाच्या पैशाची अफरातफर या संस्थेने केल्याचे बोलले जात असून जवळपास 44 लाखांची थकबाकी त्यांच्यावर होती.

वीज बिल संकलन करणाऱ्या पतसंस्थेकडून 44 लाखांचा घोळ... तक्रार दाखल

हेही वाचा...व्हिडिओ व्हायरल: भाजी विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार, गटारातून काढलेल्या भाज्या विक्रीला

महावितरणाच्यावतीने ग्राहकांचे घरगुती वीज बिल हे महावितरणच्या कार्यालय व्यतिरिक्त बँक, पतसंस्था अशा ठिकाणीही भरता येते. अशाच प्रकारे भंडाऱ्यात वीज बिल भरण्यासाठीची व्यवस्था शहरातील लक्ष्मी महिला नागरी पतसंस्था येथे करण्यात आली होती. मागील कित्येक वर्षांपासून नागरिक येथे वीज बिलाचा भरणा करतात. मात्र, पतसंस्था ग्राहकांनी भरलेली रक्कम महावितरणच्या खात्यात नियमितपणे भरत नव्हती.

प्रत्येक वेळी वीज बिलापोटी जमा झालेल्या रकमेतील काही रक्कम कमी भरली जात असे. मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे रक्कम वाढत 44 लाखांपर्यंत पोहोचली. ही बाब महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी यात लक्ष घातले.

हेही वाचा...इंग्रजीची भीती विसरून कैदी गिरवताहेत धडे; हर्सूल कारागृहातील चित्र

भंडारा महावितरण अधिकऱ्यांनी या संदर्भात पतसंस्थेला वारंवार पत्र पाठविले. मात्र, पतसंस्थेकडून सकारात्मक उत्तर मिळत नव्हते. त्यामळे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये 44 लाख रुपयांची अफरातफर केल्याबाबत पतसंस्थेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील निलंबित केले आहे.

या संदर्भात पतसंस्थेच्या मालकांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी या विषयी बोलण्यास नकार दिला. तर पोलिसांनी सुद्धा या संदर्भात चौकशी सुरु असल्याने ती पूर्ण झाल्याशिवाय बोलण्यास नकार दिला. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार तक्रार दाखल झाल्यानंतर या पतसंस्थेनी 44 लाख पैकी 27 लाख भरले आहेत. मात्र झालेल्या आर्थिक घोळ नेमका कोणी केला, हे चौकशीअंती पुढे येईल. सध्या या पतसंस्थेत वीज बिल घेण्याचे काम थांबवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details