भंडारा जिल्ह्यात मास्क अनिवार्य, 500 रुपये दंडासह होणार कायदेशीर कारवाई
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढलेला आहे. हा सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे आणि हॅन्ड सॅनिटायझर करणे या सर्व गोष्टी प्रत्येक नागरिकांनी आवर्जून पाडावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. तेव्हाच कोरोनाचा हा संसर्ग थांबविण्यात किंवा त्याला आळा घालण्यात यश मिळू शकते, असे त्यांनी सांगितले आहे.
भंडारा - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर अंकुश लावण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी यांनी कोठार पावले उचलत बुधवारपासून मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. मास्क न वापरणाऱ्या लोकांवर आतापर्यंत दीडशे रुपये दंड आकारण्यात येत होता. तो वाढवून आता पाचशे रुपये दंड करण्यात आले आहे. दुसऱ्यांदा मास्क न वापरता आढळलेल्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश नमूद केले आहे.
भंडारा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापासून सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे. मंगळवारी सुद्धा 142 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. 1 सप्टेंबर पासून केवळ पंधरा दिवसात 1000 वरुन रुग्ण संख्या 3 हजारांवर पोहोचली आहे. म्हणजे केवळ पंधरा दिवसात 2000 नवीन रुग्ण आढळले असून मृतांची संख्या 25 वरून 68 वर पोहोचली आहे. म्हणजे केवळ 15 दिवसात 43 लोकांचा मृत्यू झाला आहे.
यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलत घराबाहेर वावरणार्या प्रत्येक नागरिकांसाठी मास्क अनिवार्य करण्याचा आदेश मंगळवारी काढला. या आदेशानुसार आता मास्क न वापरणाऱ्या लोकांना 150 एवजी 500 रुपयांचा दंड भरावा लागेल. तसेच त्यानंतर हेच व्यक्ती दुसऱ्यांदा विना मास्क आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. या अगोदरही भंडारामध्ये मास्क न घालणाऱ्या लोकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ दीडशे रुपये दंड असल्याने नागरिक विना मास्क फिरताना अजूनही दिसत आहेत.
सध्या भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढलेला आहे. हा सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे आणि हॅन्ड सॅनिटायझर करणे या सर्व गोष्टी प्रत्येक नागरिकांनी आवर्जून पाडावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. तेव्हाच कोरोनाचा हा संसर्ग थांबविण्यात किंवा त्याला आळा घालण्यात यश मिळू शकते, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी बुधवारपासून भंडारा जिल्ह्यात मास्क घालणे हे अनिवार्य केले आहे. ही कारवाई नगर पालिका आणि पोलीस विभाग यांना करायची आहे.