महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सात तालुक्यातील केंद्रांमध्ये महिलाराज, संपूर्ण जबाबदारी असणार महिला अधिकाऱ्यांकडे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सखी मतदान केंद्र स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यात मदत होणार आहे.

भंडारा निवडणूक

By

Published : Apr 7, 2019, 3:03 PM IST

भंडारा - लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतही निवडणूक आयोग महिला सक्षमीकरणाचा संदेश देणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ७ मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी ही संपूर्ण महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. ही मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून ओळखली जाणार आहेत.


लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक लोकसभा मतदार संघात महिलांचे व्यवस्थापन असलेले मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील भंडारा, साकोली व तुमसर विधानसभा क्षेत्रात ७ मतदान केंद्रांवर महिलाराज राहणार आहे. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागा वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

अशी केली जाणार सखी मतदान केंद्रात तयारी -
सखी मतदान केंद्र अधिकाधिक आकर्षक व सुंदर बनविण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह येथील सफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने मतदारांचे मतदान वाढविण्यासाठी दिव्यांग व महिलांवर भर दिला आहे. त्यांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सखी मतदान केंद्र स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यात मदत होणार आहे.

ही आहेत सखी मतदान केंद्रे -

  • भंडारा तालुक्यातील मतदान केंद्र क्र. १२३-
  • लाल बहादूर शास्त्री हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय भंडारा
  • पवनी तालुक्यातील मतदान केंद्र क्र.४२९
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलनी, तुमसर
  • मोहाडी तालुक्यातील मतदान केंद्र क्र.२१८
  • जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा खापा, मतदान केंद्र क्र.२२०
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विहिरगाव, लाखांदूर तालुक्यातील मतदान केंद्र क्र. ३५०
  • जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर नवीन इमारत, लाखनी तालुक्यातील मतदान केंद्र क्र. १२३-
  • मुरमाडी सावरी समर्थ महाविद्यालय
  • साकोली तालुक्यातील तहसिल कार्यालय साकोली

निवडणूक आयोगाने आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मतदान केंद्र सर्व सोयीनिशी सजविलेले असणार आहेत.
ही असणार निवडणुकीची वैशिष्ट्ये-
निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर तंत्रज्ञानाचा वापर करुन मतदानाचे वेबकास्टींग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार भंडारा, साकोली व तुमसर विधानसभा क्षेत्रातील काही मतदान केंद्रातून वेबकास्टींग करण्यात येणार आहे. यासाठीची तयारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एनआयसीच्या माध्यमातून केली आहे. सखी मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र व वेबकास्टींग हे या लोकसभा निवडणूकीचे वैशिष्टय राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details