महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारामध्ये महाराष्ट्र दिवस साजरा, महादेव जानकरांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण - police parade

सामाजिक समतेच्या आणि पुनरुत्थानाच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे.

भंडारा मध्ये साजरा झाला महाराष्ट्र दिवस

By

Published : May 1, 2019, 11:29 AM IST

भंडारा - जिल्ह्यात 1 मे महाराष्ट्र दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. पशु व दुग्धमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी जानकर परेडचे निरिक्षण करुन सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस दलातर्फे संयुक्त संचलन व गृहरक्षक दल यांच्यातर्फे संयुक्त मानवंदना देण्यात आली.

भंडारा मध्ये साजरा झाला महाराष्ट्र दिवस

यावेळी महादेव जानकर यांनी महाराष्ट्र हे प्रथमपासूनच देशातील आघाडीचे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राची गणना प्रगत राज्यामध्ये होतो. आपल्या राज्याचे नाव सांगितले तरी त्याचा वेगळा इतिहास सांगण्याची गरज नाही. शब्द आणि अर्थ यांची इतकी चपखल सांगड असणारे महाराष्ट्र हे नाव क्वचितच असेल, त्यामुळे महाराष्ट्र हा शूरवीरांचे, ऋषी-मुनींचे, थोर तपस्वींचे, संत-महंतांचे, कलावंतांचे, क्रांतिवीराचे राज्य आहे. देशाच्या प्रत्येक चळवळीमध्ये महाराष्ट्राने नेतृत्व दिले आहे. मोगलासारख्या महासत्तेला आव्हान देऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे श्री. शिवछत्रपती हे युगपुरुष महाराष्ट्रात जन्माला आल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

सामाजिक समतेच्या आणि पुनरुत्थानाच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, दीन दलितांचे तारणहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक समतेचा पाया स्वकर्तृत्वाने रचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज या प्रात:स्मरणीय त्रिमूर्ती महाराष्ट्राने देशाला दिल्या, ही केवढी अभिमानास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्राची संतपरंपरा हा तर भल्याभल्या समाजशास्त्रज्ञांना अचंबित करणारा प्रकार आहे. वेगवेगळया जातीमधून आलेले हे संत अवघ्या महाराष्ट्राचे झाले असे ते म्हणाले. महाराष्ट्र हा शूरवीरांचे, ऋषी-मुनींचे, थोर तपस्वींचे, संत-महंतांचे, कलावंतांचे, क्रांतिवीराचे राज्य आहे. देशाच्या प्रत्येक चळवळीमध्ये महाराष्ट्राने नेतृत्व दिले आहे. मोगलासारख्या महासत्तेला आव्हान देऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे श्री. शिवछत्रपती हे युगपुरुष महाराष्ट्रात जन्माला आले असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
सामाजिक समतेच्या आणि पुनरुत्थानाच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, दीन दलितांचे तारणहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक समतेचा पाया स्वकर्तृत्वाने रचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज या प्रात: स्मरणीय त्रिमूर्ती महाराष्ट्राने देशाला दिल्या. ही केवढी अभिमानास्पद गोष्ट आहे. महाराष्ट्राची संतपरंपरा हा तर भल्याभल्या समाजशास्त्रज्ञांना अचंबित करणारा प्रकार आहे. वेगवेगळया जातीमधून आलेले हे संत अवघ्या महाराष्ट्राचे झाले, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details