भंडारा -भंडारा जिल्ह्यात 21 तारखेला फक्त 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर (सोमवार) आज एकही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. बऱ्याच महिन्यानंतर भंडारा जिल्ह्यासाठी ही एक समाधानकारक गोष्ट आहे. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.सोशल डिस्टेंसिंग, मास्क लावणे आणि स्वच्छता ठेवणे, या गोष्टी पाडल्या तर लवकरच भंडारा जिल्हा कोरोनामुक्त होईल.
जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 93.10 टक्के-
जिल्ह्यात आज 63 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 11153 झाली असून आज फक्त 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11979 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.38 टक्के एवढा आहे. आज 188 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले आहेत. आतापर्यंत 01 लाख 044 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 11979 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
आतापर्यंत 11153 रुग्णांनी केली कोरोनावर मात-
भंडारा जिल्ह्यात आज केवळ 17 कोरोना पॉझिटिव्ह, एकाही व्यक्तीचा मृत्यू नाही - bhandara corona news
जिल्ह्यात आज 63 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 11153 झाली असून आज फक्त 17 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 10, मोहाडी 01, तुमसर 01, पवनी 02, लाखनी 01, साकोली 02 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत 11153 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 11979 झाली असून 188 क्रियाशील रुग्ण आहेत. आज एकही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसून जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या एकूण 286 झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र नागरिकांना मिळालेल्या संधीचा दुरुपयोग होतांना दिसत आहे. लग्न समारंभ असतील किंवा इतर कार्यक्रमातील त्यामध्ये नागरिक गर्दी करतात. बाजारपेठेतही नागरिक गर्दी करत आहेत. तर काही लोक विना मास्क फिरत आहेत. त्यामुळे कोरोनापासून गाफील राहू नका, कारण ब्रिटनमध्ये आढळेला नवा कोरोना हा जुन्या कोरोनापेक्षाही जास्त घातक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोरोनाला दूर ठेवायचे असल्यास नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
नागरीकांना आवाहन-
- कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
- साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.
- साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा
हेही वाचा- राज्यात उद्यापासून नाईट कर्फ्यू लागू; मुख्यमंत्र्यांचा निर्णय