भंडारा- गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. 31 डिसेंबरला पाऊस कमी पडला. मात्र, 2 जानेवारीला पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ऐन हिवाळ्यात भंडाऱ्यात पाऊस; पिकांचे नुकसान
गुरुवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला रिमझिम बरसणारा पाऊस विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा बरसला.
गुरुवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सकाळी 10 वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला रिमझिम बरसणारा पाऊस विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा बरसला. जिल्ह्यात बुधवारपर्यंत 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा - 31 डिसेंबरच्या आनंदावर पावसाचे विरजण, गारठा वाढला
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सतत 3 दिवसांपासून पाऊस बरसत असल्याने भाजीपाला पिकाला कीड लागण्याची शक्यता आहे.