महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वडिलांच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून मुलीने दुसऱ्या दिवशी दिला पेपर, बनायचे आहे आयएएस - भंडारा

शिक्षकांनी दिलेल्या धाडसामुळे प्रणालीने वडिलांच्या पार्थिवजवळ बसून रात्रभर अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी दुःखाचा डोंगर बाजूला सारून  पेपर व्यवस्थित सोडवून तिने त्यानंतर आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

प्रणाली मेश्राम आणि तिचे वडील खेमराज मेश्राम

By

Published : Mar 6, 2019, 10:52 PM IST

भंडारा -वडिलांच्या पार्थिवाजवळ रात्रभर बसून मुलीने दुसऱ्या दिवशी परीक्षा दिल्याची हृदयस्पर्शी घटना लाखांदूर तालुक्यात घडली आहे. परीक्षेनंतर मुलीने वडिलांच्या पार्थिवास अग्नी दिला. वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी पेपर दिला असून त्यांच्या इच्छेनुसार आयएएस किंवा आयपीएस बनण्याचे संकल्प प्रणाली मेश्राम या लेकीने केला आहे.

प्रणाली मेश्राम

प्रणालीची दहावीची परीक्षा सुरू होती. मात्र, दुर्दैवाने परीक्षेच्या काळातच वडिलांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. वडिलांच्या निधनामुळे प्रणाली पूर्णपणे हादरून गेली. दुसऱ्या दिवशी तिचा इंग्रजीचा पेपर होता. त्यामुळे ती भांबावून गेली. अशातच तिचे मुख्याध्यापक एसके खोब्रागडे, पर्यवेक्षक मुळे आणि सहशिक्षक संजय प्रधान यांनी प्रणालीच्या घरी जाऊन तिची परीक्षेसाठी मानसिक तयारी केली आणि तिच्या वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी तिला इंग्रजीच्या पेपरची तयारी करण्यास सांगितले.

शिक्षकांनी दिलेल्या धाडसामुळे प्रणालीने वडिलांच्या पार्थिवजवळ बसून रात्रभर अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी दुःखाचा डोंगर बाजूला सारून पेपर व्यवस्थित सोडवून तिने त्यानंतर आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तिच्या धाडसाचा आणि तिने घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर दुःख बाजूला ठेऊन तिने इंग्रजीचा पेपर व्यवस्थित सोडविला वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी खूप शिकेल उच्चशिक्षित होऊन आयएएस किंवा आयपीएस होईल असा संकल्प प्रणालीने केला आहे.

प्रणालीचे वडील खेमराज मेश्राम हे राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक पदावर काम करीत होते. पत्नी आणि दोन मुलांसह त्यांचा संसाराचा गाडा जेमतेम चालत होता. एसटी महामंडळामध्ये असल्यामुळे पैशाची नेहमीच चणचण भासायची. त्यामुळे आपल्या मुलांनी शिकून मोठ्या पदावर जावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे ते प्रणालीला नेहमीच प्रोत्साहन देत असत. मात्र, अचानक त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला. मुलीचे दहावीचं वर्ष, कर्करोगाच्या उपचारावर होत असलेला खर्च एवढ्या सगळ्या दुःखातही खेमराज मात्र मुलीला अभ्यासासाठी सतत प्रोत्साहन द्यायचे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details