महाराष्ट्र

maharashtra

भंडाऱ्यात चार नव्या कोरोना रुग्णांची भर, जिल्ह्यातील बाधितांची संख्या 18 वर

By

Published : May 27, 2020, 12:57 PM IST

जिल्ह्यामध्ये पुन्हा चार नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णांचा एकूण आकडा 18 वर पोहोचला आहे. यापैकी तीन रुग्ण साकोली तालुक्यातील तर एक लाखांदूर तालुक्यातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक व्यक्ती कोरोनामुक्त झाला आहे. तर सध्या 17 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

four new corona patients found in bhandara
भंडाऱ्यात चार नव्या कोरोना रुग्णांची भर

भंडारा- जिल्ह्यामध्ये पुन्हा चार नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने रुग्णांचा एकूण आकडा 18 वर पोहोचला आहे. यापैकी तीन रुग्ण साकोली तालुक्यातील तर एक लाखांदूर तालुक्यातील आहे. यामुळे, उद्यापासून भंडारा, लाखांदूर तालुका कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित होणार असल्याचे जिल्ह्यधिकारी यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एक व्यक्ती कोरोनामुक्त झाला आहे. तर सध्या 17 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज आढळलेला 40 वर्षीय रुग्ण पळसगाव येथील असून तो मुंबईवरून दुचाकीने गावी आला होता. तर दुसरा रुग्ण हा महालगाव येथील असून हा रुग्णसुद्धा मुंबईवरून एका चारचाकीने नागपूरपर्यंत आला आणि नंतर दुचाकीने भंडाऱ्यात आल्यावर त्याला क्वारंटाईन केले गेले होते. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 16 लोकांना धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

तिसरा रुग्ण हा कुंभली येथील असून मुंबईवरून आला होता. यानंतर त्याला क्वारंटाईन केले होते. तर चौथा रुग्ण हा खैरी गावातील असून हा 24 वर्षीय तरुण ठाण्यावरून ट्रकने मासळ येथे आला आणि तिथून तो खैरी गावात गेला. तो एक दिवस घरी राहिला आणि 13 ते 23 पर्यंत क्वारंटाईन सेंटरमध्ये राहिला. आता खैरी गावही कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले असून घरतोडा आणि मासळ हे गाव बफरझोन म्हणून घोषित केले गेले आहे. सदर भागात येणारे-जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करण्यात यावे. असे आदेश जिल्हाधिकारी एम.के. प्रदीपचंद्रन यांनी दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details