महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याने भंडारा जिल्ह्यातील ४० लोकांना तोंडाचा कॅन्सर

तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याने जिल्ह्यातील ४० लोकांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील जवळपास ४० टक्के नागरिक खर्रा आहेत.

जागतिक तंबाखूविरोधी दिन

By

Published : May 31, 2019, 11:26 PM IST

Updated : May 31, 2019, 11:39 PM IST

भंडारा - तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याने जिल्ह्यातील ४० लोकांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील जवळपास ४० टक्के नागरिक खर्रा खात आहेत. खर्रा सेवनामुळे भविष्यात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा धोका डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

३१ मे हा जागतिक तंबाखू विरुद्ध दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये जवळपास १० लाख लोक दरवर्षी विविध आजाराने मृत्यू पावतात. यामध्ये महाराष्ट्रात ३६ टक्के पुरुष व ५ टक्के महिलांचा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे कॅन्सरने मृत्यू होतो.

जागतिक तंबाखूविरोधी दिन

सिगारेट, बिडी, तंबाखू, गुटका या तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते. भंडारा खर्राचे सेवन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागापासून तर शहरी भागातील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध स्त्री, पुरुष सर्वच व्यसनाच्या आहारी गेले आहेत. जवळपास ४० टक्क्यांच्या वर लोक हा खर्रा खातात. या खर्राचे विविध प्रकार आहेत. विविध प्रकारच्या तंबाखू, सुपारी, चूना यांचे मिश्रण करून खर्रा तयार केला जातो. खर्रामध्ये कोणती तंबाखू घातली जाते त्यावरून त्याचा दर ठरतो. १० रुपयांपासून ते ४० रुपयापर्यंत हा खर्रा मिळतो.

भंडारा जिल्ह्यात खर्रा खाणाऱ्यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे जिल्ह्यातील शासकीय इमारती दवाखाने सार्वजनिक जागा प्रत्येक ठिकाणी हे खर्रा बहाद्दर थुंकून थुंकून सर्वत्र घाण पसरविण्याचे काम करतात, विशेष म्हणजे ज्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर स्वच्छता राखण्याची जबाबदारी असते ते कर्मचारी अधिकारी आणि राजकीय नेते नगरपालिकेतील प्रत्येक भिंतींवर आपल्या खर्रा च्या पिचकाऱ्या उडवितात त्यामुळे परिसर तर घाण होतोच सबोत इतरांच्या आरोग्याला धोकादायक ठरते.

जे लोक सतत खर्रा किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थ खातात त्याच्या तोंडाच्या आत जेव्हा लालसर चट्टा, अल्सर किंवा पांढरे डाग दिसल्यास त्यांनी डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. कॅन्सर हा ३ टप्प्यात असतो. पहिल्या टप्प्यातील कॅन्सर हा मर्यादित जागेतच होतो. अशा कॅन्सरवर सर्जरी करून रुग्णाचे प्राण वाचवता येतात. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कॅन्सर हा शरीरातील काही भागात पसरलेला असतो. अशा रुग्णांना रेडिओथेरपो, केमोथेरेपी देऊन उपचार केले जातात. तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सर म्हणजे मेटाझिन हा पुर्ण शरीरात पसरलेला असतो. अशा रुग्णांचे वाचण्याचे प्रमाण खूप कमी असते.

Last Updated : May 31, 2019, 11:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details