महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोसेखुर्द धरणात मासेमारीसाठी गेलेला मच्छिमार तीन दिवसांपासून बेपत्ताच, शोधकार्य संथ गतीने होत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

गोसेखूर्द धरणात मासेमारी करीत असतांना अचानक आलेल्या वादाळाने नाव उलटली. त्यामुळे दोघा बाप लेकांनी पाण्यात उड्या टाकल्या. मुलगा किनाऱयाला पोहोचला परंतू वडिल तीन दिवसापासून बेपत्ता आहे.

मृत पांडुरंग कांबळी

By

Published : Jun 12, 2019, 3:52 PM IST

भंडारा - गोसेखूर्द धरणात मासेमारी करीत असतांना अचानक आलेल्या वादाळाने नाव उलटली. त्यात मुलगा पोहत किनाऱयालगत पोहोचला, पण वडिल बेपत्ता झाले. मागील तीन दिवसांपासून गावातील ढीवर समाजील लोक त्यांचा शोध घेत आहे. परंतू प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप गावकरी आणि कुटुंबातील नातेवाईक करीत आहेत.

बेपत्ता पांडुरंगचा गावकरी शोध घेत आहे
गोसे धरणाच्या विशाल पात्रात दररोज मोठ्या प्रमाणात ढीवर बांधव मासेमारी करण्यासाठी येतात. 9 जूनलाही नेहमीप्रमाणे पांडुरंग वकटू कांबळी (वय 55) व त्याचा मुलगा मच्छिंद्र हे दोघे पाथरी लगत असलेल्या नदीपात्रात सायंकाळी 4 वाजता मासेमारीसाठी गेले. मासेमारी करीत असतांना अचानक पावसाला सुरुवात झाली. म्हणून दोघेही किनाऱ्यावर जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळीवाऱ्यामुळे त्यांची नाव उलटली. दोघेही पाण्यात पडल्याने त्यांनी पोहायला सुरवात केली. मच्छिंद्र पोहत किनाऱ्यावर पोहचला. मात्र त्याचे वडील पांडुरंग किनाऱ्यावर पोहचू शकले नाही. मच्छिंद्र हा काठावर पोहचल्यावर त्याच्या हे लक्षात आले की त्याचे वडील किनाऱयावर पोहचले नाही. त्यांनी लगेच शोधाशोध सुरू केली मात्र त्याच्या पदरात निराशाच पडली.सदर प्रकरणाची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला दिली. मात्र याकडे तीन दिवस होऊनही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. घटनास्थळी तहसीलदारांनी अजूनही भेट दिलेली नाही. काल सायंकाळी 4-5 वाजताच्या सुमारास बोट येऊन 20 मिनिटांची शोधाशोध करण्यात आली. यानंतर ही बोट लगेच परत गेली. ठाणेदार, मंडळ अधिकारी घटनास्थळी येतात व क्षणभर थांबून परत जातात, असे पीडित कुटुंबीयांनी सांगितले. प्रशासकीय व्यवस्थेने विशेष यंत्रणा राबवून पाण्यात बुडालेल्या पांडुरंग यांचा शोध घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details