ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhandara Crime: क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल - Financial fraud In Bhandara

महिन्याभरामध्ये दाम दुप्पट करून देतो असे सांगून बोरा ब्रॅंड या (Financial fraud In Bhandara) ऑनलाइन ट्रेडिंग साईटच्या माध्यमातून लोकांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या दोन लोकांवर भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यापैकी एकाला अटक झाली (crypto currency fraud Bhandara) असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे. किशोर कुंभारे व विकी झाडे असे या आरोपींची नावे आहेत. भंडारा जिल्ह्यातील लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे येत आहे. (online trading site Bora Brand)

Bhandara Crime
बोरा बॅंड
author img

By

Published : Jul 4, 2023, 10:06 PM IST

आर्थिक घोटाळ्याबाबत पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया

भंडारा:बोरा ब्रॅंड ही क्रिप्टो करन्सी आहे. यामध्ये पैसे गुंतविल्यास महिन्याभरात रक्कम दुप्पट होते, (Financial fraud In Bhandara) असा प्रचार सुरू होता. यासाठी शहरातील दोन लोक विक्की झाडे आणि किशोर कुंभारे लोकांना प्रलोभन देत होते. (crypto currency fraud Bhandara) या बोराने मागील काही महिन्यांपासून भंडारा शहरात धुमाकूळ घातला होता. या प्रलोभनाला शहरातील तरुणच नाही तर मजूर, भाजीविक्रेते, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी आणि डॉक्टर मंडळी इतकेच काय तर पोलीस कर्मचारीसुद्धा बळी पडले. या लोकांनी त्यांच्या कष्टाची कमाई यामध्ये घातली. एवढंच नाही तर काहीनी कर्ज घेऊन किंवा स्वत:ची मालमत्ता विकून यामध्ये पैसे घातले. (online trading site Bora Brand)

पोलीस अधिक्षकांचा पुढाकार:सुरुवातीला विक्की झाडे, किशोर कुंभारे आणि काही लोकांना यामधून कोट्यावधी रुपये मिळाले. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून ही साईट बंद झाली. यामुळे ज्या लोकांनी यामध्ये पैसे गुंतविले आहेत त्यांची मात्र चांगलीच फसवणूक झाली आहे. मात्र कोणीही तक्रार देण्यास तयार नव्हते. पोलीस अधीक्षक मतांनी यांनी पुढाकार घेत लोकांना या ॲपपासून सजत राहण्याचे आणि जर त्यांची फसवणूक झाली असल्यास तशी तक्रार देण्याची विनंती केली. यानंतर स्वतःचे एक लाख रुपये यामध्ये गुंतवणूक केलेल्या पवन मस्के यांनी पोलीस अधीक्षक यांना माहिती दिली की त्यांनी भरलेले पैसे काढण्यासाठी प्रयत्न केले असता त्याचे पैसे विड्रॉल होत नाही. याविषयी विक्की झाडे आणि किशोर कुंभारे याला विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर मिळत आहेत.

एकास अटक, दुसरा फरार:गुंतवणूकदारांना विश्वासात घेण्यासाठी सात तारखेला सर्वांची पैसे मिळतील अशी माहिती या बोरा ॲपच्या लोकांकडून मिळत आहे. मात्र हे केवळ वेळकाढूपणा असल्याचा पवन मस्के यांना लक्षात येतात त्यांनी भंडारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. त्याच्या तक्रारीची दखल घेतली पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी लगेच कारवाईचे आदेश दिले आणि आरोपी किशोर कुंभारे यांना अटक करण्यात आली. दुसरा आरोपी विक्री झाडे सध्या फरार आहे. या दोघांविरुद्ध कलम 420, 406, 34 व सहकलम 3 महाराष्ट्र ठेवीदारांचा अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाची चौकशी होणार:यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. कुणीतरी हे ॲप तयार करून त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एजंट स्वरूपात सुरुवातीला काही लोकांना नेमले जाते. लोकांना विश्वास बसावा म्हणून या नियुक्त लोकांना पैसे गुंतविण्यास सांगून ते दुप्पट केले जातात. हाच दाखला देत नंतर या लोकांकडून समाजातील इतर नागरिकांनाही प्रलोभन देत गुंतवणूक करण्यास भाग पाडले जाते. या तक्रारीनंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने आता सखोल चौकशी करण्यात येईल. गुन्हा दाखल असलेल्या आरोपींचे बँक खाते गोठविण्यात येतील. सोबतच ज्या लोकांशी या पैशाच्या माध्यमातून व्यवहार केला गेला असेल त्यांचेही खाते उठवून पीडित लोकांना पैसे दिले जातील अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

पोलीस प्रशासनाचे आवाहन:यात फसवणूक झालेल्या नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी आणि आपले बयान नोंदवावे. ज्या कुणी आपणास पैसे जमा करण्याचा आग्रह केला असेल अशांची नावे पोलिसांना सांगावी असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या व्यतिरिक्त इतर कुठल्याही ऑनलाईन ॲपमध्ये पैसे गुंतवणूक करू नका, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केले आहे.

हेही वाचा:

  1. Pune Crime: येरवडा मनोरुग्णालयातील धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
  2. Gold Smuggling Case: सोने तस्करीकरिता वाट्टेल ते... महिलेने चक्क गुप्तांगात लपवून आणलेले तब्बल २० लाख रुपयांचे सोने
  3. शेत जमिनीच्या वादातून दोन सख्या भावांची निर्घृण हत्या; दुहेरी हत्याकांडाने खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details