भंडाऱ्यात विवाहितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकाला नागरिकांचा चोप - lakhani
एका विवाहितेला आपल्या दुचाकीवर जबरदस्तीने बसवून तिला निर्जन ठिकाणी नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकाला नागरीकांनी चोप दिला.
भंडारा - जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखनी येथील नगरसेवक अनिल निर्वाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा अड्याळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. एका विवाहितेला आपल्या दुचाकीवर जबरदस्तीने बसवून तिला निर्जन ठिकाणी नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. महिलेने तत्परता दाखवीत स्वतःला आरोपीच्या तावडीतून सोडविले आणि लोकांना या घटनेची माहीती दिली. यानंतर जमलेल्या जमावाने या नगरसेवकाला चांगलाच चोप दिला आहे. हा प्रसंग सोशल मीडियावर वायरल झाला असून जिल्हात याप्रसंगाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.