भंडारा - जिल्ह्यामध्ये 9 ते 14 एप्रिलच्या काळात संचारबंदी अधिक कडक केली जाणार आहे. त्यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्यांनी घरीच बसावे अन्यथा पोलिसांच्या रोषाला आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे, असा इशारा जिल्हाधिकारी प्रदीप चंद्रन यांनी दिला आहे. घराबाहेर निघणाऱ्या नागरिकांना मास्क घालूनच निघावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात संचारबंदी अधिक सक्तीची; प्रशासनाला सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
विनाकारण फिरणाऱ्यांनी घरीच बसावे अन्यथा पोलिसांच्या रोषाला आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे, असा इशारा जिल्हाधिकारी प्रदीप चंद्रन यांनी दिला आहे. जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित नसल्याने आणि पुढेही कोरोनाबाधित रुग्ण मिळू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.
येणाऱ्या काही दिवसात बाहेरील जिल्ह्यातील लोक भंडाऱ्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित नसल्याने आणि पुढेही कोरोनाबाधित रुग्ण मिळू नये, यासाठी ही खबरसदारी घेतली जात आहे. सध्या लॉक डाऊन सुरू असल्याने जीवनावश्यक गोष्टी वगळता बाजार पेठ पूर्णपणे बंद आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर निघावे, असे आदेश असताना बरेच लोक शहरात फिरताना दिसत आहेत. या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही 10 टक्के लोकांनी अजूनही हे लॉक डाऊन गांभीर्याने घेतले नाही.
बाहेर फिरणाऱ्यांवर गुरुवारपासून अधिक सक्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सीमेवरही नाकाबंदी वाढविली जाणार आहे. एकापेक्षा जास्त लोक दुचाकीवर असल्यास त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानात सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्यांवर कादेशीर कारवाई केली जाणार आहे. जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रदीप चंद्रन यांनी केले.