महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मागील ५ वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा तिप्पट कामे केली; मुख्यमंत्र्यांचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा आज (शनिवारी) भंडारा जिल्ह्यात पोहोचली. आम्ही मागील पाच वर्षाच्या काळात विरोधकांपेक्षा तिप्पट कामे केली असल्याची टीका फडणवीसांनी केली. मागील काही दिवसापासून भाजपामध्ये सुरू असलेली इन्कमिंग आज पुन्हा पाहायला मिळाली. बसपतर्फे खासदारकीची निवडणूक लढविणार्‍या विजया नंदुरकर आणि त्यांचे पती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 3, 2019, 8:19 PM IST


भंडारा -आम्ही मागील पाच वर्षात विरोधकांपेक्षा तिप्पट कामे केली, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा आज (शनिवारी) जिल्ह्यात पोहोचली. त्यावेळी शहरातील शिवाजी स्टेडियममध्ये घेतलेल्या सभेतलोकांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री परिणय फुके हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना संबोधित करताना "मागील पाच वर्षात आम्ही जे कार्य केले त्याचा लेखाजोखा मायबाप मतदार राजासमोर मांडण्यासाठी ही महाजनादेश यात्रा काढली आहे." असे म्हणाले. पुढे त्यांनी विरोधकांवरही टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांकडे आता विरोध करण्यासाठी कुठलेही मुद्दे नसल्याने ते ईव्हीएम मशीनचा मुद्दा काढत आहेत. आम्ही लोकांसाठी आंदोलन केले तर विरोधक मात्र मशीनसाठी आंदोलन करत आहेत. यापेक्षा मोठे दुर्भाग्य काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथे यात्रेचे आगमन होताच भाजपतर्फे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, भाजप सरकारने मागील ५ वर्षात सर्वात जास्त लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. शिक्षण, रोजगार, उद्योगधंदे, शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न ही सर्व कामे आमच्या काळात मोठ्या प्रमाणात झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी एक वेगळा आणि ऐतिहासिक निर्णय घेताना आम्ही वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ वर केल्या. तसेच प्रत्येक व्यक्तीला घरे देण्याचा निर्धार केला, शेतीसाठी कृषिपंप दिले, जलशिवार योजनेतून सिंचनाच्या सोय उपलब्ध करून दिले आहेत तलावाचे पुनर्जीवन करण्यासाठी भंडारा-गोंदियाला २०० कोटी रुपये दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

आज पुन्हा इन्कमिंग -

मागील काही दिवसापासून भाजपामध्ये सुरू असलेली इन्कमिंग आज पुन्हा पाहायला मिळाली. बसपतर्फे खासदारकीची निवडणूक लढविणार्‍या विजया नंदुरकर आणि त्यांचे पती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.

ABOUT THE AUTHOR

...view details