भंडाराउद्धव ठाकरे यांची मशाल काँग्रेसच्या हातात आहे, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भंडारा येथे पत्रकार परीषदमध्ये बोलतांना केले आहे. ज्यांनी हिंदुत्वाची कास सोडून काँग्रेसचे हात मिळवणे केली, अशा उद्धव ठाकरे यांची मशाल पेटणार नाही. सामना हा केवळ घनगती टीका करण्यासाठीच उरला आहे. दिवंगत बाळासाहेब देवसर यांचा नावाचा उपयोग केले गेल्याची टीका हे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य मशाल पेटणार नाहीशिवसेना उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या मशाल चिन्हाबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आपले मुळ हिंदूत्वाचे विचार सोडून आता आणि कोंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी केली. ज्यांनी आपले तत्व सोडले त्यांची मशाल कधीही पेटणार नाही. ही मशाल आता काँग्रेसच्या हातात आहे, अशी खोचक टीका भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
बाळासाहेब देवरस यांचं काहीही संबंध नाही.सामना मधून भाजपावर टीका करण्यात आली आहे. संघाचे सर संघ चालक दिवंगत बाळासाहेब देवरस यांचं नाव शिंदे गटाला नाव देत भाजपाने संधी साधली आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिउत्तर देत सामना हे दुसऱ्यांवर टीका करण्यासाठीच उरलेला आहे. शिंदे गटाला मिळालेला बाळासाहेबांचा नाव हा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित असून बाळासाहेब देवसर यांच्याशी त्याचा तीळ मात्र ही संबंध नाही.
आमदारांना अडचणीत आणण्याचा कामं मागील अडीच वर्षापासून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुरू होती आणि त्यामधूनच शिंदे गट हा विभक्त झाला आहे. बाळासाहेबांची शिवसेना, व उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यातील हा अंतर्गत वाद आहे. भाजपचा याच्याशी काहीही संबंध नाही. ज्या ठिकाणी सेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीची विरोधात लढत आमदार निवडूण आले. त्याठिकाणी काँगेस, राष्ट्रवादी बरोबर युती करून त्या आमदारांना अडचणीत आणण्याचा कामं शिवसेनेनं केलं आहे. त्यामूळे शिंदे गट वेगळं झालं आहे.
निवडणूक आयोगाचे आदेश मान्य राहीलदुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनाचे नाव व चिन्ह गोठवल्याने यावर स्थगिती द्यावी. म्हणुन शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. यावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असल्याने ती कोणाच्याही दबावत काम करत नाही. पण तरीही उद्धव ठाकरे हे कोर्टात गेले असले, तरी कोर्ट जो निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले आहे.