महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा नगरपालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बनलेत शोभेची वस्तू - कॅमेरे

भंडारा नगरपालिकेने लावलेले 70 लाखाचे कॅमेरे सध्या शोभेची वस्तू बनले आहेत. अडीच वर्ष पहिले मावळत्या नगराध्यक्षांनी हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवले होते.

भंडारा नगरपालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोभेची वस्तू

By

Published : Jun 6, 2019, 10:39 PM IST

भंडारा- भंडारा नगरपालिकेने लावलेले 70 लाखांचे कॅमेरे सध्या शोभेची वस्तू बनले आहेत. पहिल्या अडीच वर्षात मावळत्या नगराध्यक्षांनी हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवले होते. त्यामुळे नव्याने सत्तेवर आलेल्या नगराध्यक्षांनी मुद्दाम याकडे दुर्लक्ष करत सर्वसामान्य जनतेच्या पैशाची नासाडी केली असा आरोप होत आहे. तर आता याप्रकरणी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी बोलायला तयार नाहीत.

भंडारा नगरपालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे बनले शोभेची वस्तू

अडीच वर्षापुर्वी भंडारा नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष बाबू बागडे यांनी अध्यक्षपदाची मुदत संपण्याच्या 6 महिने अगोदर संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवले होते. हे सर्व सीसीटीव्ही लावण्याचे काम ज्या कंत्राटदाराला दिले होते. त्याच्याकडेच या कॅमेऱ्यांची एक वर्ष देखभाल करण्याची जबाबदारी होती. दरम्यानच्या काळात निवडणुका झाल्यानंतर सत्तापरिवर्तन झाले. यावेळी इतिहासात पहिल्यांदाच भंडारा नगरपालिकेत भाजपची सत्ता आली. यावेळी नगराध्यक्षपदी सुनील मेंढे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी मुद्दाम सीसीटीव्ही देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने हळू-हळू सीसीटीव्ही बंद पडू लागले.

शहरात चोरांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र, चोरानीच बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केबल चोरुन नेली आहे. आता शहरात 50 कॅमेऱ्यांपैकी केवळ 10 ते 12 कॅमेरे शिल्लक राहिले आहेत. तर मागील 2 आठवड्यापूर्वी नगरपालिकेसमोर सुरू असलेले कॅमेरेही आता बंद पडले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरांना पकडणे पोलिसांना कठीण जात आहे.

याविषयी आमच्या प्रतिनिधीने नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी प्रत्येकवेळी टाळाटाळ केली. तर मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनीही कॅमेऱ्य़ासमोर बोलण्यास मनाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details