महाराष्ट्र

maharashtra

ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे; मागणीसाठी ओबीसी क्रांती मोर्चातर्फे बाईक रॅली

By

Published : Dec 12, 2020, 9:33 AM IST

2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करावी अशी, मागणी होत आहे. या मागणीला घेऊन भंडारा ओबीसी क्रांती मोर्चाच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन केले होते.

Bike Rally
बाईक रॅली

भंडारा - 2021 मध्ये देशाची जनगणना होणार आहे. देशात ओबीसींची संख्या नेमकी किती आहे? याची माहिती मिळवण्यासाठी ओबीसीची वर्गाची स्वतंत्र जनगणना व्हावी, अशी मागणी भंडारा जिल्ह्यातील ओबीसी क्रांती मोर्चाने केली आहे. त्यासाठी काल(शुक्रवार) बाईक रॅली काढण्यात आली होती. तर, आज मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. या मोर्च्यामध्ये ज्यास्तीत ज्यास्त लोकांनी सामील व्हावे, अशी विनंती आयोजकांनी बाईक रॅली दरम्यान केली. या रॅली दरम्यान अनेकांनी कोरोनाच्या नियमांचा भंग केला.

ओबीसी मोर्चातर्फे बाईक रॅलीचे आयोजन

शासन व नागरिकांमध्ये जागृतीसाठी काढली बाईक रॅली -

मराठा क्रांती मोर्चा त्यांना आरक्षण मिळावा यासाठी लढा देत आहेत. आता ओबीसी बांधवही आपल्या हक्कासाठी लढा देताना दिसत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी मागणी ओबीसी नेते आणि ओबीसी बांधव करत आहेत. यासाठी 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करावी अशी, मागणी होत आहे. या मागणीला घेऊन भंडारा ओबीसी क्रांती मोर्चाच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन केले होते. भंडारा जिल्ह्याच्या गणेशपुर येथील शिवाजी चौकातून या बाईक रॅलीला सुरुवात होऊन भंडारा शहरातील प्रमुख रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली होती. भंडारा शहराच्या मुख्य गांधी चौकात ही रॅली पोहचल्यावर मोर्चाच्यावतीने ओबीसींची स्वतंत्र जनगणना झालीच पाहिजे, अशी घोषणा देण्यात आली.

आयोजकांना नियमांचा विसर -

ओबीसी क्रांती मोर्चातर्फे काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसले. या रॅलीत अनेक बाईकस्वार हे विना मास्क सामील झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details