भंडारा -लॉकडाऊनमुळे निर्माण होत असलेल्या रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी शक्य असेल त्या सर्व नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतींचे औचित्य साधत, भंडाऱ्यात 100 रक्तदात्यांनी रक्तदान करुन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
भंडारा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी 6 तारखेपासून 14 तारखेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. आज 14 एप्रिलला या रक्तदान शिबिराचा समारोप करण्यात आला असून या दरम्यान 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
भीमजयंती : भंडाऱ्यात रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन; 100 रक्तदात्यांनी केले रक्तदान हेही वाचा...जयंतीदिनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार नसलेला पाहून गहिवरली महिला
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होत आहे. मात्र, नागरिक घराबाहेर जात नसल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे लोकांनी नियमांचे पालन करत रक्तदान करावे, असे आवाहन लोकप्रतिनिधींकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आणि सोशल डिस्टन्सिंगचे चा पालन करत ओबीसी क्रांती मोर्चा आणि ब्रास अॅकडमी यांच्या वतीने दि. 6 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर ही प्रक्रिया निरंतर सुरू राहिली. दररोज रक्तदात्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन रक्तदान करवून घेतले जात होते. 14 एप्रिल म्हणजे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त 100 रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांना अभिवादन केले आहे.