भंडारा: जिल्हा परिषदेच्या 39 तर पंचायत समितीच्या 1900 गणासाठी 1322 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. एकूण सात लक्ष 68 हजार 866 मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यापैकी तीन लक्ष 89 हजार 130 पुरुष तर तीन लक्ष 79 हजार 636 महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हा परिषदेसाठी 245 उमेदवार नशीब आजमावत असून पंचायत समितीसाठी 417 उमेदवार रिंगणात आहेत.
Bhandara Elections: भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थ निवडणुक मतदानाला सुरुवात
भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थ निवडणुकीतील (Local Body Elections) जिल्हा परिषद (Zilla Parishad) पंचायत समिती ( Panchayat Samiti) नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या (Nagar Panchayat elections) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळी साडे सात वाजेपासून सुरुवात झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या 245 उमेदवारांपैकी 136 पुरुष उमेदवार आहेत. पंचायत समितीसाठी 617 उमेदवारांपैकी 228 189 स्त्री उमेदवार आहेत.लाखनी व लाखांदूर आणि मोहाडी यातील नगरपंचायती मध्ये 39 जागांसाठी एकूण 167 उमेदवार रिंगणात आहेत. 41 मतदान केंद्रांवर 22 हजार 896 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदानावर थंडीचा प्रभाव
सकाळी साडे सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असली तरी सध्या वाढलेल्या थंडीचा प्रभाव मतदानावर दिसत आहे. सकाळी मतदार कमी प्रमाणात घरून निघताना दिसले. दुपारनंतर मतदार घराबाहेर मतदानाला निघतील अशी अपेक्षा आहे.
तिरंगी आणि चौरंगी लढत
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी दोन उमेदवारांमध्ये सरळ सरळ लढत पाहायला मिळत आहे. तर बऱ्याच ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत आहे. आपल्या मतदारांना विजय मिळावा यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, वंचित प्रहार या सर्वच पक्षांचे नेते मंडळी प्रचारासाठी जिल्ह्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये कोणत्या पक्षाला वर्चस्व मिळेल याची उत्सुकता आहे.
1870 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी.
निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 1870 पोलिस कर्मचारी व सातशे होमगार्ड व एसआरपीएफचे तीन तुकड्या तयार आहेत तुमसर व लाखांदूर तालुक्यात दहा संवेदनशील व दोन अतिसंवेदनशील तर 17 नक्षल प्रभावित मतदान केंद्राची संख्या आहे.
मतदानाचासाठी सुट्टी जाहीर
मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यातील इतर सर्व आस्थापने व बँका ज्यांना जिल्हाधिकारी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्टी लागू होत नाही त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान करता येणे शक्य व्हावे याकरिता संबंधित आस्थापनांनी कामाच्या तासा मधून दोन तासाची सवलत देण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी काढले आहेत.