महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळले म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी अधिनस्त कर्मचाऱ्याला सुनावले

व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, नगर पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांनी शहरात फिरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करण्याऱ्या 4 दुकान मालकांवर कारवाई केली. प्रत्येकी 5000 रुपये दंड आकारला.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळले म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी अधिनस्त कर्मचाऱ्याला सुनावले
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळले म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी अधिनस्त कर्मचाऱ्याला सुनावले

By

Published : May 29, 2020, 5:00 PM IST

भंडारा - जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्यामुळे दुकाने सुरू ठेवणाऱ्या 4 व्यापाऱ्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नियमानुसार दंड आकारला. मात्र दंड का आकारला म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या प्रकारामुळे कर्मचारी गोंधळलेल्या अवस्थेत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे की मुख्याधिकारी यांचे ऐकावे अशा द्विधा मनस्थितीत हे कर्मचारी आहेत.

भंडारा जिल्ह्यात आता 6 दिवस दुकाने सुरू आहेत. मात्र, सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत या बद्दलचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. मात्र, असे असले तरी काही दुकानदार हे पाचनंतरही दुकाने सुरू ठेवायचे. सुरुवातीला या दुकानदारांना व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 5 वाजता बंद करण्याची विनंती केली. मात्र, तरीही ते ऐकत नसल्याने व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, नगर पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांनी शहरात फिरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करण्याऱ्या 4 दुकान मालकांवर कारवाई केली. प्रत्येकी 5000 रुपये दंड आकारला. यापैकी एक दुकानदार हा नगर पालिकेचा कर्मचारी असल्याने त्याने याची तक्रार एका नगरसेवकाला केली. नगरसेवकाने मुख्याधिकारी यांना तक्रार केली. दंडात्मक कारवाई करूनही केवळ नेत्यांना खुश ठेवण्यासाठी मुख्याधिकारी यांनी या अधिनस्त कर्मचाऱ्याला बोलावून त्या नेत्यासमोर चांगलेच सुनावले.

नियमाची अंमलबजावणी केल्यानंतर वरिष्ठ शाबासकी देतात मात्र भंडारा नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेगळा अनुभव मिळाला. खरंतर कोरोना हा व्यक्ती पाहून होत नाही. त्यामुळे याचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने किंवा जिल्हाधिकारी यांनी जे नियम लावले आहेत त्याचे पालन करणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details