महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा पोलिसांनी टाकली सट्टा-पट्टी केंद्रावर धाड; 21 जण अटकेत - नेतृत्वात

भंडारा शहरामधील राजीव गांधी चौकातील इमारतीत सट्टा पट्टी घेणारे मोठे रॅकेट चालत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानुसार रविवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी व भंडारा शहर पोलिसांच्या मदतीने या इमारतीवर धाड टकाण्यात आली. या कारवाईत 21 लोकांना अटक करण्यात आली आहे.

या इमारतीत पोलिसांनी धाड टाकली

By

Published : Jul 7, 2019, 11:56 PM IST

भंडारा - एका इमारतीमध्ये सुरू असलेल्या सट्टाच्या मुख्य केंद्रावर धाड टाकून 21 लोकांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 1 लाख 36 हजार रोख रक्कम, 50 ते 60 मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात ही कार्यवाही करण्यात आली. मात्र शहराच्या मुख्य भागात एवढा मोठा व्यवसाय सुरू असूनही आता पर्यंत कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या इमारतीत पोलिसांनी धाड टाकली

भंडारा शहरामधील राजीव गांधी चौकातील इमारतीत सट्टा पट्टी घेणारे मोठे रॅकेट चालत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानुसार रविवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जणबंधू व भंडारा शहर पोलिसांच्या मदतीने या इमारतीवर धाड टकाण्यात आली. कारवाई दरम्यान 21 लोक नागपूर वरून सट्टा पट्टी मोबाईल द्वारे घेत होते. या सर्वांना अटक करण्यात आली असून तब्बल 1 लाख 36 हजार रोख रक्कम, 50 ते 60 मोबाईल, संगणक, प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तसेच कलम 4/5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सट्टा पट्टीचा व्यवसाय करणाऱ्यांवर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह अजूनही बरेच आरोपी पकडल्या जाण्याची शक्यता असल्याने आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुख्य चौकात रस्त्याशेजारी या व्यवसायाचे मुख्य केंद्र आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेले या अवैध व्यवसाबद्दल स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस विभाग यांना याची माहिती आधी नव्हती काय. आज ज्या ठिकाणी कार्यवाही झाली इथे फक्त भंडारा जिल्ह्यातच व्यवहार होतो, की इतर ही जिल्ह्याच्या व्यवहार होतो, आज पकडल्या गेलेले आरोपी हे स्थानिक आहेत की इतर जिल्ह्यातील आहेत, हा व्यवसाय महाराष्ट्र पुरताच सुरू होता की मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील लोकही यामध्ये समावेश आहेत असे बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गेडाम करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details