महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

100 वर्ष जुन्या पुलावरील वाहतूक प्रशासनाने केली बंद, तरीही रहदारी सुरूच

वैनगंगा नदीवरील 100 वर्षे जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

By

Published : Jul 3, 2019, 8:58 PM IST

100 वर्ष जुन्या पुलावरील वाहतूक प्रशासनाने केली बंद, तरीही रहदारी सुरूच

भंडारा - वैनगंगा नदीवरील 100 वर्षे जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे. मात्र, तरीही लोक या याकडे नागरिक दुर्लक्ष करून या पुलावरून वाहतुक करतच आहेत.

100 वर्ष जुन्या पुलावरील वाहतूक प्रशासनाने केली बंद, तरीही रहदारी सुरूच

नवीन पुलावरून गेल्यास लांबचे अंतर पार करून जावे लागते. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात याच पूलाचा वापर करत आहेत. वैनगंगा नदीवरील 100 वर्षे जुना इंग्रज कालीन पूल 2016 मध्ये वाहतुकीसाठी धोकादायक ठरवण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला. नागरिकांच्या माहितीसाठी पुलाच्या दोन्ही बाजूला ठळक अक्षरात फलक लावले आहेत.

हा पूल भंडारा ते पवनी साकोली या मार्गांना जोडणारा एकमेव पूल होता. पावसाळ्यात बरेचदा अतिवृष्टी झाल्यानंतर हा पूल पाण्याखाली येत असे, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 पूर्णपणे बंद व्हायचा, याला पर्याय म्हणून एक नवीन मोठा पूल तयार करण्यात आला आहे. या पूलाच्या निर्मितीनंतरही नवीन आणि जुना दोन्ही पूल वाहतुकीसाठी सुरू होते. मात्र, 2016 मध्ये या इंग्रज कालीन जुन्या पुलाची तपासणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला.

जुन्या पूलावरून सर्वच वाहतूक बंद झाल्याने नवीन पुलावर वाहतुकीचे प्रमाण वाढले. बाहेरगावाहून येणाऱ्या कामगारांना सायकलवरून प्रवास करताना अडचणी निर्माण व्हायला लागल्या. त्यामुळे पादचारी लोकांनाही या वाढलेल्या वाहतुकीचा त्रास होत होता. त्यामुळे नागरिकांच्या मागणीवरून जुन्या पूलावर पादचारी आणि सायकलने जाणार्‍या लोकांसाठी एका भागावरून जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला. मात्र, आता या पूलावरून दुचाकी ऑटो रिक्षा यांची ही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details