महाराष्ट्र

maharashtra

पोस्टमन काका झाले एटीएम, आता घर बसल्या मिळतात पैसे

By

Published : Aug 5, 2020, 12:48 PM IST

Updated : Aug 5, 2020, 5:15 PM IST

तुम्हाला पैसे हवे असल्यास बँकेच्या रांगेत उभे राहण्याची किंवा एटीएमपर्यंत जाण्याची गरज नाही. केवळ एक फोन करा आणि पैसे तुमच्या घरी येतील. कारण पत्र घेऊन घरोघरी पोहोचणारे पोस्टमन काका आता चालते-फिरते एटीएम मशीन बनले आहेत.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक
पोस्टमन काका झाले एटीएम... आता घर बसल्या मिळतात पैसे

भंडारा - तुम्हाला पैसे हवे असल्यास बँकेच्या रांगेत उभे राहण्याची किंवा एटीएमपर्यंत जाण्याची गरज नाही. केवळ एक फोन करा आणि पैसे तुमच्या घरी येतील. कारण पत्र घेऊन घरोघरी पोहोचणारे पोस्टमन काका आता चालते-फिरते एटीएम मशीन बनले आहेत. ग्रामीण, शहरी भागातील नागरिक, वृद्ध, अपंग, अंध किंवा इतर सर्व ज्यांना पैसे हवे आहेत, त्यांना बँकेत किंवा एटीएमपर्यंत जाणे शक्य नाही, अशा प्रत्येकाला आता घरपोच सेवा मिळणार आहे. तेही निशु:ल्क! महामारीच्या काळात यामुळे फायदा होणार आहे.

आयपीपीबी म्हणजेच 'इंडिया पोस्ट पेमेंट बँक'च्या अंतर्गत अगदी तळागळातील ग्रामीण भागाच्या लोकांपर्यंत पैशांची सुविधा पोहोचावी यासाठी 'आधार अनेबल पेमेंट सिस्टम' (AEPS) च्या माध्यमातून पोस्टमन्सला मोबाइल आणि फिंगर स्कॅनर देण्यात आले आहे. पत्र वाटताना ज्या नागरिकांना पैशांची गरज आहे, त्यांना घरी जाऊन नगद पैसे देतात. यासाठी नागरिकांचा केवळ बँक खात्याशी आधार कार्ड नंबर लिंक करणे आवश्यक आहे. पैशांची गरज असल्यास प्रत्येक पोस्ट ऑफिसचा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. यावर संपर्क सधल्यानंतर घरी, दुकानात, ऑफिसमध्ये पैसे पोहोचतील. या उपक्रमाअंतर्ग बँकेतून 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल.

पोस्टमन काका झाले एटीएम, आता घर बसल्या मिळतात पैसे
या सुविधेचा सर्वात जास्‍त फायदा हा वृद्ध नागरिक, अपंग, अंध नागरिकांना होत आहे. तसेच बँक खूप लांब असलेल्या गावातील नागरिकांनादेखील याचा फायदा होणार आहे. कोरोनाच्या काळात ज्या लोकांना घराबाहेर निघणे शक्य नव्हते किंवा बँकेच्या रांगेत उभे राहण्याची ज्यांची शारीरिकदृष्ट्या सुदृढ नाही, अशा सर्वांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.

वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या सुविधेचा लॉकडाऊनच्या काळामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतला आहे. मार्च ते ऑगस्ट या कालावधीत तब्बल दोन कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. पोस्ट ऑफिसद्वारे मिळणाऱ्या या सुविधेबाबत अद्याप अनेकांना माहिती नाही. भविष्यात प्रत्येक व्यक्तीला ही सुविधा मिळाल्यास बँकेतील रांगा कमी होतील आणि लोकांसाठी सोयीस्कर होईल.

Last Updated : Aug 5, 2020, 5:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details