भंडारा - पवनी तालुक्यात टिप्परच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्ह्या सामान्य रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान झाला.
पवनीमध्ये टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जखमी - भंडारा बातम्या
पवनी येथून 8 किमी अंतरावर असलेल्या निष्ठीजवळ मागेहून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने नरेंद्र दिलीप भोयर याचा मृत्यू झाला. तर निखिल अनेश्वर सोनटक्के जखमी झाला आहे.
पवनी येथून 8 किमी अंतरावर असलेल्या निष्ठीजवळ मागेहून येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने नरेंद्र दिलीप भोयर (वय 22 रा. धानोरा ता. पवनी) याचा मृत्यू झाला. तर निखिल अनेश्वर सोनटक्के (वय 24 रा. धानोरा ता. पवनी) जखमी झाला आहे. हे दोघे मोटारसायकलने भिवापूरकडून पवनीकडे येत असताना निष्टीजवळ भरधाव वेगाने मागून येणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. यात नरेंद्रच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला निखिल जखमी झाला, त्याच्या डोक्याला व पायाला मार लागला. त्याला पवनी येथे प्राथमिक उपचार करून भंडारा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
धडक देणारा टिप्पर हा भिवापूरकडून पवनीकडे भरधाव वेगाने येत होता. त्याने अनेकांच्या गाड्यांना कट मारून निघून गेल्याची चर्चा असून घटना घडताच टिप्पर घटनास्थळावरून पसार झाला. पवनी पोलिसांना आता हा टिप्पर शोधणे एक आव्हान आहे. अगोदरही या भागात रेतीच्या टिप्परने अपघात झाल्याने एकाच मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी टिप्पर जाळले होते आणि जवळपास 4 तास रस्ता रोखला होता.