महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोसे धरणाचे सात दरवाजे यावर्षी पहिल्यांदाच अर्धा मीटरने उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा - गोसे धरण

गोसे धरणाचे 33 पैकी 7 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे उघडण्यात आली असून त्यातून 767 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

bhandara irrigation
गोसे धरणाचे सात दरवाजे यावर्षी पहिल्यांदाच अर्धा मीटरने उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा

By

Published : Jul 24, 2020, 6:26 PM IST

भंडारा - गोसे धरणाचे 33 पैकी 7 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 767 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोसे धरणाचे सात दरवाजे यावर्षी पहिल्यांदाच अर्धा मीटरने उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा
मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात आणि गोसे धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सुरुवातीला गोसे धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर पुन्हा दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. या सातही दरवाजांतून एकूण 667 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. पाणी भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. त्यामुळे या जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे.

गोसे धरणाची सध्याची जलाशय पातळी 243.500 मीटर आहे. एकूण प्रकल्पाचा पाणीसाठा 1146.08 तर जिवंत उपयुक्त पाणीसाठा 740.17 दलघमी एवढा आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा 360.5 दलघमी आहे. तर आजच्या पावसाची टक्केवारी 8.00 मीटर आहे. मागील वर्षी याच तारखेला उपयुक्त पाणी साठा 3.42 दलघमी ज्याची टक्केवारी 0.46 एवढी होती. येत्या दोन दिवसांत आणखी पाऊस झाल्यास 243.5 मीटरची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी गरजेनुसार दारं उघडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details