महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 5, 2022, 10:36 PM IST

Updated : Feb 5, 2022, 10:49 PM IST

ETV Bharat / state

7 wild animals die in Bhandra : विषबाधा झालेली शेळी खाल्ल्याने अड्याळ वन परिक्षेत्रात 7 वन्यप्राण्यांचा मृत्यू; वनविभागाचा निष्कर्ष

अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गट क्रमांक ७४० झुडपी जंगलांतर्गत येणान्या पिंपळगाव निपानी परिसरात दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रथमतः एक बिबट्या मृतावस्थेत ( leopard death in Bhandara ) आढळला. याची माहिती अड्याळ येथील वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे यांना मिळताच त्यांनी वनकर्मचाऱ्यांसह ( forest officer Ghanshyam Thombare ) घटनास्थळ गाठले

अड्याळ वन परिक्षेत्रात 7 वन्यप्राण्यांचा मृत्यू
अड्याळ वन परिक्षेत्रात 7 वन्यप्राण्यांचा मृत्यू

भंडारा - जिल्ह्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रात 8 वन्यप्राणांचा विषबाधेमुळे ( 7 wild animals die ) मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. विषबाधेने मृत पावलेली शेळी खाल्ल्याने ( animal death after eating poisoned goat ) बिबट्यासह दोन कोल्हे, तीन रानकुत्रे व एक रानमांजरीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव निपानी गटक्रमांकात ( wild animal death in Bhandrara ) ही घटना घडली

बिबट्याचा आढळला मृतदेह
अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गट क्रमांक ७४० झुडपी जंगलांतर्गत येणान्या पिंपळगाव निपानी परिसरात दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रथमतः एक बिबट्या मृतावस्थेत ( leopard death in Bhandara ) आढळला. याची माहिती अड्याळ येथील वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे यांना मिळताच त्यांनी वनकर्मचाऱ्यांसह ( forest officer Ghanshyam Thombare ) घटनास्थळ गाठले. गडेगाव आगाराचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी नागुलवार हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. परिसरात अधिक तपास केले असता अन्य ठिकाणी काही प्राणी मृतावस्थेत असल्याचीही माहिती मिळाल्याने त्यांनी तब्बल तीन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. यात दोन कोल्हे ( जॅकल ) , तीन रानकुत्रे व एका कालव्यात रानमांजर ( बेलमांजर ) मृतावस्थेत आढळून आले. तीन किलोमीटरच्या परिसरात सात वन्यजीव मृतावस्थेत आढळल्यानंतर वनविभागांच्या अधिकाऱ्यांनी एकच खळबळ उडाली.

वन परिक्षेत्रात 7 वन्यप्राण्यांचा मृत्यू

हेही वाचा-Mumbai Traffic Jam : अमृता फडणवीसांचा दावा, 'ट्राफिक जॅममुळे मुंबईत घटस्फोट', प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच..

पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमुला पाचारण
हा नेमका प्रकार कसा घडला याचा शोध घेतला घेण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू बोलाविण्यात आली. पशुसवंर्धन पशुचिकित्सालय पवनीचे सहाआयुक्त ड . सचिन भोयर , लाखनीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके, डॉ. विठ्ठल हटवार , डॉ. व्ही. बी. चव्हाण, डॉ. एन. एम. सोनकुसरे घटनास्थळी दाखल झाले. तसेच फिरते पथक संजय मेंढे , भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजुरकर , लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावीत, अड्याळ वनपरिक्षेत्राचे सर्व वनपाल व नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे श्वान पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. बिबट्या हा सात ते आठ वर्षाचा असून ती मादी होती. दोन कोल्हे हे मादी आहेत. तर तीन रानकुत्रे नर होते. शवविच्छेदनाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्याच परिसरात त्यांच्यावर अग्निदाह संस्कार करण्यात आले.

हेही वाचा-PM Modi Eat Chana: पंतप्रधानांनी थांबविला ताफा अन् शेतात जाऊन हरभऱ्यांचा घेतला आस्वाद

विषबाधा झालेली शेळी खाल्ल्याने प्राण्यांचे मृत्यू
वन्य क्षेत्रातील एखादी विषबाधा झालेल्या शेळीला या वन्यप्राण्यांनी खाल्ले असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तीन किलोमीटरच्या परिसरात हे वन्यप्राणी आढळून आल्याने नेमकी विषबाधा कुठे झाली असावी याचा तपास घेतला जात आहे . जवळपास दोन दिवसांपूर्वी बिबटाचा मृत्यू झाला असावा. सर्व प्राणी विषबाधेने दगावले , या निष्कर्षापर्यंत वनखाते पोहचले आहे. अधिक माहिती काढण्याचे काम सुरू आहे, असे लाखनीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी सांगितले.

हेही वाचा-Attack on Kirit Somaiya : महाविकास आघाडीने शिवरायांचा महाराष्ट्र बिहारपेक्षा वाईट करून ठेवला - भाजप नेते अनिल बोंडे

Last Updated : Feb 5, 2022, 10:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details