भंडारा - शनिवारी जिल्ह्यातील चार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 18 जण कोरोनामुक्त झाले असून 23 लोक उपचार घेत आहेत. तसेच शनिवारी एकही नवीन कोरोनाचा नवीन रुग्ण जिल्ह्यात आढळला नसल्याने प्रशासन आणि नागरिकांच्या दृष्टीने ही समाधानाची गोष्ट आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यामुळे जिल्ह्याची बाधित रुग्णांची एकूण संख्या 41 वर गेली होती. मात्र, शनिवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर उपचार घेत असलेल्या 27 रुग्णांपैकी 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आता केवळ 23 बाधित रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात, अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड रुग्णालय येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठवले जातात.