भंडारा- भंडारा आरोग्य विभागाचे भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आले आहे. शुक्रवारी सहा लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र प्रत्यक्षात सहापैकी चार मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन मृतदेहांची ओळख पटली नसल्याने त्यांचा अंत्यविधी करण्यात आला नाही. या मृतांचे नातेवाईक शोधण्याचे काम आता आरोग्य विभाग करत आहे. याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला. मात्र त्यांनी माहिती दिली नाही.
कोरोनाच्या 6 मृतांपैकी 4 जणांनाच अग्नी, प्रशासनाकडे मृतांची माहिती नसल्याने गोंधळ - crematory in bhandara
शुक्रवारी सहा लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र प्रत्यक्षात सहापैकी चार मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन मृतदेहांची ओळख पटली नसल्याने त्यांचा अंत्यविधी करण्यात आला नाही. या मृतांचे नातेवाईक शोधण्याचे काम आता आरोग्य विभाग करत आहे. भंडारा प्रशासनाचा भोंगळ कारभार यामुळे समोर आला आहे.
दोन मृतदेहांची माहिती मिळत नसल्याचे समोर येताच आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली. अधिकाऱ्यांनी शोध सुरू केल्यानंतर एक मृतदेह भंडारा शहरातील असल्याचे समजले. या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू गुरुवरी रात्री झाला. मात्र वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गलथानामुळे मृताच्या नातेवाइकाला दुपारनंतर निधनाची माहिती देण्यात आली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाल्याने पालिकेचे कर्मचारी परत गेले होते. त्यामुळे शुक्रवारी या मृतदेहाला अग्नी दिला नाही. उशिरापर्यंत पाचव्या व्यक्तीचा शोध लागला. असला तरी सहावा मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटवण्याचे काम सुरू आहे. याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते यांना फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे आरोग्य विभागाची बाजू अद्याप अस्पष्ट आहे.