महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्न आटपून परतताना कारचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, २ गंभीर - मृत्यू

भंडारा-पवनी राष्ट्रीय महामार्गावर आज (शनिवारी) दुपारी सायतानागर वार्डजवळील अड्याळ येथे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

लग्न आटपून परतताना कार व ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, २ गंभीर

By

Published : Apr 27, 2019, 11:21 PM IST

भंडारा - भंडारा-पवनी राष्ट्रीय महामार्गावर आज (शनिवारी) दुपारी सायतानागर वार्डजवळील अड्याळ येथे कार आणि ट्रकचा अपघात झाला. यामध्ये २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. लग्न आटपून परत येत असताना हा अपघात झाला आहे.

हनुमान रामाजी मेश्राम आणि मनोज जुगनाखे (दोघेही रा. मु. मोहपा ता. उमरेड) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर शुभम वाकडे व विनोद जुगनाके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम अड्याळ ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चालक आणि त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती किरकोळ जखमी आहे.

लग्न आटपून परतताना कार व ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, २ गंभीर

चंद्रपूर जिह्याच्या उमरेड तालुक्यातील हे ६ तरुण अड्याळ येथून लग्न समारंभ आटपून कारने (एमएच-३१-DC-६९५) उमरेडला परत जात होते. त्यावेळी कार भरधाव असल्याने चालकाचे संतुलन बिघडल्याने कारने समोरून भंडाऱ्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला (एमएच-३०-L-२७३) ला मागच्या बाजूने धडक दिली. त्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली जावून एका झाडावर आदळली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये २ जणांचा जागीच मृत्यू झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details