महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दीडशे वर्षाची परंपरा जपण्यासाठी आधुनिक 'शंकरपट'; पहिल्यांदाच बैलाऐवजी धावले ट्रॅक्टर

मासळ या गावात दीडशे वर्षांपासून शंकरपटाचे आयोजन केले जाते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जनावरांच्या शंकर पटावर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखत आणि दीडशे वर्षाची परंपरा जोपासत ग्रामस्थांनी नवीन शक्कल लढवली.

By

Published : Feb 5, 2019, 12:59 PM IST

bhandra

भंडारा -जिल्ह्यातील मासळ या गावात दीडशे वर्षांपासून शंकरपटाचे आयोजन केले जाते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जनावरांच्या शंकर पटावर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखत आणि दीडशे वर्षाची परंपरा जोपासत ग्रामस्थांनी नवीन शक्कल लढवली. या वर्षीपासून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा शंकरपट भरविला.

bhandra

ज्या पद्धतीने बैलांचा शंकरपट भरविला जात होता अगदी त्याच पद्धतीने ट्रॅक्टरचे शंकरपट भरविले गेले. सहा फूट रुंद असलेला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एक ट्रॅक तयार केला. प्रत्येकाने या ट्रॅक्टरच्या आतूनच ट्रॅक्टर चालवायचा आणि विशेष म्हणजे ट्रॅक्टर रिव्हर्समध्ये चालवायचे होते. ट्रॅक्टरचे चाक जराही ट्रॅकच्या बाहेर गेले तर स्पर्धक बाद होतो.

आधुनिक शंकरपट


पहिल्या दिवशी एक-एक ट्रॅक्टर कमीत कमी वेळात पोहोचण्याच्या शर्यती होत्या. तर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसातील कमी वेळात जिंकणाऱ्या ट्रॅक्टरच्या १० जोड्या लावून त्यांच्या शर्यती लावल्या. एका वेळेला २ ट्रॅक्टर आपापल्या ट्रॅकवरून रिव्हर्समध्ये प्रथम पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते. पहिल्यांदाच भरविलेला ट्रॅक्टर शंकरपट पाहण्यासाठी गावकऱ्यांनी आणि परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. याच ट्रॅक्टर शंकरपटाच्या बाजूलाच सर्जा राजाचा बाजारही होता. शेतकऱ्याचा जुना मित्र असलेल्या सर्जा, राजाला आजही मोठी मागणी आहे. मात्र, शंकरपटावर बंदी आल्याने पटासाठी प्रसिद्ध असलेल्या बैलजोडीला मिळणारी किंमत आता मात्र मिळत नाही.


आमची दीडशे वर्षाची परंपरा जपण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर शंकरपटाचे आयोजन केले आहे. बैलांची शंकरपट हे केवळ मनोरंजन नसून बैलांना शेतीसाठी तयार करण्याची पद्धत होती. शंकर पटावर असलेली बंदी उठवून शंकरपट नव्याने सुरू करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details