भंडारा - जिल्ह्यात मरकजवरून आलेल्या लोकांची संख्या 13 झाली आहे. गुरुवारी 2 लोकांना शोधून काढण्यात आले होते. तर शुक्रवारी पुन्हा 11 मरकजवरून आलेल्या, लोकांनाशोधून काढण्यात आले आहे. या सर्वांच्या घशाचे नमुने घेतले असून अहवाल येणे बाकी आहेत. या सर्वांना इन्स्टिट्यूट कोरंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून पूर्ण 34 इन्स्टिट्यूट कोरंटाईन आहेत. तर 10 लोकांना आयसोलेशन विभागात ठेव,ण्यात आले आहे.
भंडाऱ्यात मरकजवरून आलेले पुन्हा 11 नवीन लोक सापडले.. - तबलिगी लोक
आतापर्यंत 53 लोकांचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असून या पैकी 30 नमुने निगेटिव्ह आले असून बाकी ची प्रतीक्षा आहे.
ज्या निजामुद्दीनच्या मरकजमधील लोकांनी देशात एक भीतीचे वातावरण पसरविले आहेत त्या सर्वांना शोधून काढण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. शुक्रवारी ऐका भागात काही लोक आहेत जे 15 ते 18 दरम्यान निजामुद्दीन वरून आले आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरही ते खोटं बोलत होते. मात्र, त्यांच्याकडे मिळालेल्या तिकीट च्या माध्यमातून ते निजामुद्दीन वरून आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या घश्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून या 11 ही लोकांना इन्स्टिट्यूट कोरंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत 53 लोकांचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले असून या पैकी 30 नमुने निगेटिव्ह आले असून बाकी ची प्रतीक्षा आहे.
भंडारामध्ये अजूनतरी एकही व्यक्ती कोरोनाबाधित नाही. जिल्ह्यधिकारी यांच्या योजना, पोलीस अधीक्षक यांच्या चमूने संभाळलेली कायदा व्यवस्था आणि आरोग्य विभागामार्फत केली जात असलेली तपासणी या सर्वांचा फायदा अजून तरी जिल्ह्यात कोणीही कोरोना बाधित नाही.ॉ