महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून दरवर्षी 1 कोटीचा निधी - यशोमती ठाकूर - महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1 कोटीचा निधी

महिला व बालविकास राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांनी भंडारा जिल्ह्याचा दौरा केली. यामध्ये त्यांनी महिला व विकास महामंडळ अंतर्गत सुरू असलेली कामे तसेच जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. दरवर्षी महिला व बाल विकास भवनासाठी जिल्हा नियोजनमधून 1 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

1 crore annually  for women empowerment from district planning in bhandara
महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा नियोजनमधून दरवर्षी 1 कोटीचा निधी

By

Published : Jul 31, 2020, 3:24 PM IST

भंडारा - महिला व बालविकास राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांनी भंडारा जिल्ह्याचा दौरा केली. यामध्ये त्यांनी महिला व विकास महामंडळ अंतर्गत सुरू असलेली कामे तसेच जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. दरवर्षी महिला व बाल विकास भवनासाठी जिल्हा नियोजनमधून 1 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यतील महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आदेश त्यांनी पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत बचत गटाचे काम उत्कृष्ट आहे. असे चांगले काम करुन महिला सक्षमीकरणाला चालना द्या, असे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. बचत गटाच्या हँडलूम उद्योगाच्या कामास त्यांनी शुभेच्छा दिल्या. दरवर्षी महिला व बाल विकास भवनासाठी जिल्हा नियोजनमधून 1 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा माहिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळाचा आढावा सादरीकरणाद्वारे घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ 1 हजार 142 लाभार्थ्यांना मिळाला आहे. त्याची रक्कम 1 कोटी 35 लाख 25 हजार वितरित केली असून, जिल्हा राज्यात प्रथम क्रमाकांवर आहे. पोषण अभियान अंतर्गत आधारकार्ड सिडींग करण्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले असून जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. महिलांना अस्मिता योजनेचा लाभ देण्यातही जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तसेच जिल्हयामध्ये पोषण परसबाग विकसित करण्यामध्ये 206 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. या उपलब्धीबद्दल यशोमती ठाकूर यांनी महिला व बाल विकास विभागाचे अभिनंदन केले.

जिल्हयात 1 हजार 305 अंगणवाडी केंद्राची संख्या असून आदर्श आंगणवाडी केंद्राच्या इमारतीसाठी 53 लक्ष निधी मंजूर आहे. एकरकमी लाभाची रक्कम अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. यावेळी तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेसचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, आंगणवाडी बांधकाम, पोषण आहार, माझी कन्या भाग्यश्री, अस्मिता योजना, परसबाग योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, माविमचे प्रदीप काठोळे व विजय नंदागवळी यांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, तसेच लाभार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत श्रीमती ठाकूर यांनी कोविड-19 चा आढावा घेतला. जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्हयात सरासरी प्रतीदिन 154 नमुने चाचणीसाठी पाठविण्यात येतात. आतापर्यंत 7 हजार 238 व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 6 हजार 867 नमुने निगेटिव्ह आले असून, 248 पॉझिटिव्ह आहेत. पाझिटिव्ह पैकी 197 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 131 अहवालांची प्रतिक्षा आहे. जिल्हयात 1 हजार 352 अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून, त्यापैकी 1 हजार 339 निगेटिव्ह तर 13 पॉझिटिव्ह आल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असून, आरोग्य तपासणीसह जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 222 खाटांचे कोविड समर्पित रुग्णालय उभारण्यात आले असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक फ्ल्यु ओपीडी सुरु करण्यात आली आहे. निर्जंतुकीकरण व स्वच्छता यावर भर देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यामध्ये कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊले उचलून अंमलबजावणी केल्याचे ठाकूर यांनी सांगितले. यावेळी दहावी परिक्षेत प्रथम आलेल्या ऋतुजा वाघाये या विद्यार्थींनीचा यशोमती ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

ABOUT THE AUTHOR

...view details