महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड रेल्वे स्थानकात मालगाडीसमोर झोपून तरुणाची आत्महत्या - तरुणाची आत्महत्या

बीड रेल्वे स्थानकावरील रुळावर मालगाडी धावत असताना एका तरुणाने पळत जाऊन या गाडीसमोर झोपून आत्महत्या केली.

मालगाडीसमोर झोपून तरुणाची आत्महत्या

By

Published : Aug 27, 2019, 8:15 PM IST

बीड - मालगाडी समोर झोपून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार आज मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास परळी रेल्वे स्थानकावर घडल्याची माहिती आहे.

बीड रेल्वे स्थानकावरील रुळावर मालगाडी धावत असताना एक तरुण पळत जाऊन या गाडीसमोर झोपला. यामुळे त्याच्या मृतदेहाचे तुकडे झाले असून हा थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विष्णू बाळासाहेब सावंत (वय 25) असून तो ऊखळी तालुका सोनपेठ जिल्हा परभणीचा रहिवासी आहे.

मालगाडीसमोर झोपून तरुणाची आत्महत्या

या आत्महत्येचे कारण अजून समजू शकलेले नाही. तरी, या घटनेचा पुढील तपास परळी पोलीस करत आहेत. दरम्यान, या थरारक घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details