आष्टी ( बीड ) - रानडुकरांपासून डाळिंब बागेचे नुकसान होऊ नये यासाठी लावलेल्या विद्युत संरक्षण जाळीला चिटकून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शुक्रवार 29 जुलै रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ही घटना ( Death of a young farmer in Ashti ) घडली. हा तरुण शेतकरी पाहणी करण्यासाठी गेला असता विद्युत प्रवाह लावलेला लक्षात न आल्याने याच संरक्षण जाळीला चिकटून त्याचा जागीच मृत्यू ( Farmer Died By Electric Shock ) झाला. अमोल माणिक नरवडे (वय 30 वर्ष) असे त्या मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
विद्युत प्रवाह बंद करण्याचे विसरला आणि झाला अपघात -आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे घराच्या काही अंतराला लागूनच डाळिंब बाग आहे. या ठिकाणी रानडुकरांचा मोठा उपद्रव असतो. बागेचे नुकसान होत असल्याने शेतकर्याला मनस्ताप सहन करावा लागतो. रानडुकरांपासून बचाव व्हावा म्हणून संरक्षण जाळीला विद्युत प्रवाह सोडला होता.