महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Liquor Ban : दारूबंदीसाठी महिला आक्रमक; दारू विकल्यास किंवा पिल्यास जमीन जप्त, 10-25 हजारांचा दंडही बसणार - दारूबंदीसाठी महिला आक्रमक

बीडच्या कुटेवाडी गावात दारूबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. गावात दारू विकली गेली तर विकणाऱ्याचे 5 गुंठे शेत जप्त होणार ( Farm seized liquor seller or drink ) आहे. त्याशिवाय 25 हजारांचा दंड ठोठावण्यात येणार ( 25 thousand fine for liquor seller ) आहे. दारू पिऊन येणाऱ्याचेही 5 गुंठे शेत जप्त होणार आहे. आणि 10 हजारांचा दंड ठोठावण्यात येणार ( 10 Thousand Fine Consume Alcohol ) आहे.

Women Aggressive for liquor Prohibition
दारूबंदीसाठी महिला आक्रमक

By

Published : Jan 7, 2023, 3:09 PM IST

दारूबंदीसाठी महिला आक्रमक

बीड : बीडच्या कुटेवाडी गावातील महिलांसह ग्रामस्थ दारूबंदीसाठी आक्रमक झाले ( Women villager aggressive for liquor ban ) आहेत. ग्रामस्थांनी दारूबंदीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गावातील व परिसरातील दारू बंद व्हावी यासाठी दारु विक्री करणाऱ्यास 25 हजार रोख दंड ( 25 thousand fine for liquor seller ) आणि पाच गुंठे जमीन घेतली जाईल. तर दारू पिऊन गावात येणाऱ्याला 10 हजार रु रोख दंड आणि पाच गुंठे जमीन ग्रामपंचायतीच्या नावावर केली ( 10 Thousand Fine Consume Alcohol ) जाईल. तसेच नियमाचे पालन न करणाऱ्याला वेगळे ठेवले जाणार असून कुठल्याही सुखसोयी दिल्या जाणार नाहीत. असा अनोखा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

निर्वस्त्र करून गाढवावरून धिंड :याशिवाय जर या निर्णयाचाही परिणाम झाला नाही. तर जो व्यक्ती दारू पिऊन गावात येईल त्याला निर्वस्त्र करून त्याची गाढवावरून धिंड काढली जाईल. असा निर्णय कुटेवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला आहे. दरम्यान यासाठी कुटेवाडी येथील महिलांनी पुढाकार घेतला आहे. येथील महिला आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या कुटेवाडी गावात दारू विकली जाणार का ? गावात कुणी दारू पिऊन येणार का ? आणि जर असे झाले तर ग्रामस्थ काय करणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कुटूंबावर परिणाम : दारू गावामध्ये विकली जाते त्याचबरोबर फाट्यावर सुद्धा विकली जाते. धाब्यावर विकली जाते, धाब्यावाले गावातही लोकांना पोहोच करतात, त्याचबरोबर धाब्यावाले फोन केल्यावर घर पोहोचही करतात, दारू पिल्यामुळे घरच्या माणसांना चिडचिड करतात, आई-वडिलांना मारहाण करतात मुलांना मारहाण करतात बायकांना मारहाण करतात, भावजय यांना मारतात भावांना मारतात त्याचबरोबर संपूर्ण घराला या दारू पासून त्यांचा त्रास ( Farm seized liquor seller or drink ) होतो. असे गावातील महिला ग्रामस्थाने सांगितले. तर दारू विकणाऱ्यासाठी 25 हजार रुपये दंड केला आहे. दारू पिणाऱ्या साठी 10 हजार रुपये दंड केला आहे. जो विकणारा व पिणारा आहे त्यांच्या नावावर असलेली पाच गुंठे जमीन ग्रामपंचायत च्या नावावर केली जाणार आहे. सरपंच, उपसरपंच व सर्व गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, असे दुसऱ्या महिला ग्रामस्थाने सांगितले.

चपलाचा हार घालून गाढवावरून धिंड : दारू पिणाऱ्याला 10 हजार रुपये दंड लावण्यात आला. त्याशिवाय व्यक्तीला चपलाचा हार घालून त्याची गाढवावरून धिंड काढली जाणार आहे. हा निर्णय सर्व गावकऱ्यांनी घेतला आहे, असे गावातील ग्रामस्थ आजोबांनी सांगितले. हा निर्णय आम्ही सर्व महिला व सरपंच उपसरपंच ग्रामस्थांनी मिळवून घेतला आहे. कारण या दारूमुळे अनेक लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक मुले व्यसनाच्या आहारी चालले आहेत. त्याचबरोबर अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. दारू पिल्यामुळे अनेकांचे अपघातही होत ( Accident Happend Alcohol Consumption ) आहेत. त्यामुळे अपघातात अपंगत्व व मृत्यूही ओढावत आहे. त्यामुळे गावातील लोकांनी हा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details