बीड- संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे प्रचंड मतांनी विजयी होऊन आमदार व्हावेत, यासाठी शहरातील महिलांनी प्रभु वैद्यनाथ येथे जलाभिषेक करून वैद्यनाथाला साकडे घातले. परळी विधानसभेची निवडणूक मुंडे विरुध्द मुंडे अशी बहिण-भावात अतिषय अटीतटीची लढत झाली आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, दलित समाजाचे प्रश्न धनंजय मुंडे यांनी सोडविले आहेत. सत्ताधाऱ्यांना विधान परिषदेत सळो की पळो करून सोडले आहे, त्यामुळे धंनजय मुंडे हे आमदार व्हावेत, असे साकडे घालत महिलांनी भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाला जलाभिषेक केला.