आष्टी(बीड)- जिल्ह्यातील सांगवी पाटण येथे माहेरुन चारचाकी घेण्यासाठी पैसे न आणल्यामुळे विवाहितेला जीवे मारल्याची घटना घडली.सुवर्णा कैलास खिलारे (३०) असे त्या मृत विवाहितेचे नाव असून याप्रकरणी नवरा, सासू, सासरऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हुंडाबळी! माहेरवरून पाच लाख न आणल्याने सासरच्यांनी काढला तिचा काटा
सुवर्णाला पती, सासू आणि सासऱ्यांनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये असा सारखा तगादा लावला होता. तिने नकार देताच त्या तिघांनी संगनमत करुन तिच्या डोक्यात जड वस्तूने वार केले. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
सुवर्णाला पती, सासू आणि सासऱ्यांनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये असा सारखा तगादा लावला होता. तिने नकार देताच त्या तिघांनी संगनमत करुन तिच्या डोक्यात जड वस्तूने वार केले. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना २३ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. याप्रकरणी पती कैलास श्रीमंत खिलारे (३६),श्रीमंत नामदेव खिलारे (५५), शकुंतला नामदेव खिलारे (४९) यांच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश कऱ्हाडे करत आहेत.