परळी वैजनाथ - तालुक्यातील हेळंब येथील शिवारात पाच शेळ्याचा हिंस्त्र प्राण्याने शनिवारी (ता.१४) फडशा पाडला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. माऊली आंधळे या शेतकऱ्याच्या शेळ्यांवर हा हल्ला झाला.
हेळंब येथे पाच शेळ्यांचा हिंस्त्र प्राण्याने पाडला फडशा - लांडग्याने पाडला फडशा
हेळंब येथे चार ते पाच शेळ्यांचा हिंस्त्र प्राण्याने पाडला फडशा; शेतकऱ्याचे सुमारे २१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेळंब येथील शिवारात माऊली आंधळे यांची शेती आहे. या शेता जवळ आण्णां गुणाजी आंधळे यांच्याकडे जवळपास 10 शेळ्या आहेत. एका शेळीची किंमत सध्या 21 हजार रुपयांच्या जवळपास आहे. शनिवारी (ता.१४) रात्री अचानक पाच शेळ्यांचा हिंस्त्र प्राण्याने फडशा पाडला. सकाळच्या सुमारास आंधळे यांनी गोठ्यात पाहणी केली असता शेळ्यांचे लचके तोडलेले सापळे आढळून आले.
परिसरातील जाणकारांच्या मते लांडग्याने या शेळ्यांचा फडशा पाडला असावा, असा अंदाज काढला आहे. मात्र श्री.आंधळे यांचे यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाने यासंदर्भात पंचनामे करुन आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी श्री.आंधळे यांनी केली आहे.