बीड- पावसाळ्या सुरु होऊन साडेतीन महिने उलटले तरी देखील केस तालुक्यामधील मांजरा धरण कोरडे पडले आहेत. मांजरा धरणातून बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना होणार पाणीपुरवठा ऑक्टोंबरपासून बंद करण्याचा निर्णय लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे लातूर शहराला पुन्हा एकदा रेल्वेने पाणी देण्याची परिस्थिती ओढावली आहे.
मांजरा धरणातून लातूरला पाणीपुरवठा होणार बंद; 1 ऑक्टोंबरपासून होणार बंद - beed district
बीड जिल्ह्यातील 144 सिंचन प्रकल्पापैकी 109 सिंचन प्रकल्प आजही कोरडेच आहेत. परतीच्या पावसावर या सिंचन प्रकल्पातील पाणीसाठाचे भवितव्य अवलंबून आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत. बीड जिल्ह्यातील 144 सिंचन प्रकल्पापैकी 109 सिंचन प्रकल्प आजही कोरडेच आहेत. परतीच्या पावसावर या सिंचन प्रकल्पातील पाणीसाठाचे भवितव्य अवलंबून आहे. केज तालुक्यातील मांजरा धरणातुन लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होत होता. मात्र आता या धरणातील पाणी संपले आहे. त्यामुळे 1 ऑक्टोंबर पासून लातूरसह उस्मानाबाद शहर आणि गावांना होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.
त्याचप्रमाणे अंबाजोगाई शहराला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. मांजरा धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर काळवटी साठवण तलावातून अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करावा लागणार आहे. येत्या काळात समाधानकारक पाऊस झाला तरच मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, जिल्ह्याची तहान भागणार आहे. अशी सगळीकडे परिस्थिती निर्माण झाली आहे.