महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा समाजासाठी काम करणाऱ्या 'सारथी' संस्थेला जाणीवपूर्वक स्थगिती - विनायक मेटे

मराठा समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 'सारथी' सारखी संस्था स्थापन करण्यात आली होती. या संस्थेअंतर्गत मराठा समाजातील गोरगरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या होत्या. या संस्थेसाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, राज्यात भाजपची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने 'सारथी' या संस्थेला स्थगिती दिली आहे.

beed
मराठा समाजासाठी काम करणाऱ्या 'सारथी' संस्थेला जाणीवपूर्वक स्थगिती - विनायक मेटे

By

Published : Dec 9, 2019, 8:49 PM IST

बीड - बार्टीच्या धरतीवर मराठा समाजातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप-शिवसेना युतीच्या काळात 'सारथी' सारखी संस्था सुरू करण्यात आली होती. मात्र, भाजपची सत्ता जाऊन महाविकास आघाडीचे सरकार येताच प्रशासनाने सारथी संस्थेला स्थगिती देऊन मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतला असल्याचा घणाघात शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी केला. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा समाजासाठी काम करणाऱ्या 'सारथी' संस्थेला जाणीवपूर्वक स्थगिती - विनायक मेटे

हेही वाचा -उच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला दणका; जन्मठेप कायम

मेटे म्हणाले, की मराठा समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 'सारथी' सारखी संस्था स्थापन करण्यात आली होती. या संस्थेअंतर्गत मराठा समाजातील गोरगरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात होत्या. या संस्थेसाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, राज्यात भाजपची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने 'सारथी' या संस्थेला स्थगिती दिली आहे.

हेही वाचा -परळीत महाविकास आघाडीचा राज्यातील पहिला विजय; धनंजय मुंडें गटाने सिरसाळा ग्रा. प. निवडणूकीत मारली बाजी

यावेळी मेटे यांनी हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. सारथी संस्थेला स्थगिती देणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा शिवसंग्राम आंदोलन करेल, असा इशारा विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details