बीड: उभ्या ट्रॉलीला दुचाकीची धडक; दोन जागीच ठार - Two-wheeler collision with trolley In beed
रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची जोरात धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना माजलगाव गेवराई रोड वर घडली. रविराज शेंडगे (वय 21), विवेक मायकर (21) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
बीड-रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची जोरात धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना माजलगाव गेवराई रोड वर घडली. रविराज शेंडगे (वय 21), विवेक मायकर (21) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, रविराज शेंडगे, विवेक मायकर तसेच अन्य एक जण माजलगाव गेवराई रस्त्यावरून मोटार सायकल ने केसापुरी कॅम्प कडे जात होते. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या उसाच्या ट्रॅलीला त्यांनी जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की मोटार सायकलचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत रविराज रामहरी शेंडगे (वय 20) रा.उमरी तर विवेक भागवत मायकर (वय 21) रा. पिंपळगाव (नाकले) या दोन तरुणांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर तिसरा ओंकार काळे हा तरुण गंभीर जखमी असुन त्यास औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले आहे.