महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान गोपीनाथ मुंडेंच्या ज्येष्ठ सहकाऱ्याला धक्काबुक्की

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे याचे जुने सहकारी आणि जेष्ठ स्वयंसेवक विजयकुमार पालसिंगणकर यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली.

बीडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना धक्काबुक्की

By

Published : Sep 8, 2019, 7:36 PM IST

बीड -भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे याचे जुने सहकारी आणि ज्येष्ठ स्वयंसेवक विजयकुमार पालसिंगणकर यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मुलाखती दरम्यान ही धक्काबुक्की करण्यात आला. या घटनेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी विजयकुमार पालसिंगणकर यांना दोन कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना बीडमध्ये घडली. यावेळी इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काही जणांनी संघाच्या वरिष्ठांपर्यंत ही माहिती कळविली असून, याची गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती बीड येथील जिल्हा भाजप कार्यालयात घेण्यात आल्या. यावेळी सहा मतदारसंघातील विविध नेत्यांनी मुलाखती दिल्या.

दरम्यान आरएसएस संपर्क प्रमुख व इतर प्रमुख स्वयंसेवकांना या विषयी माहिती देण्यात आली आहे. एका ७२ वर्षीय ज्येष्ठ कार्यकर्त्यावर असा प्रसंग बेतल्यामुळे भाजपमधील एका फळीतून नाराजी व्यक्त केली जात असून, याप्रकाराचा निषेध होत आहे. या संदर्भात आरएसएसकडून गंभीर दखल घेतली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

बीडसह इतर मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अनेक भाजपचे नेते बीड येथील कार्यालयात शुक्रवारी उपस्थित होते. यावेळी स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, माजी आमदार कराड हे मुलाखत घेत होते. यावेळी माजी आमदार आदिनाथ नवले, केशव आंधळे, नवनाथ शिराळे, सुनील गलांडे, आमदार सुरेश धस, आमदार संगीता ठोंबरे, आमदार लक्ष्मण पवार, आमदार आर. टी. देशमुख, आमदार भीमराव धोंडे, जयदत्त धस यांच्यासह जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे व इतर ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मुलाखत देण्यासाठी आले होते. यामध्ये विजयकुमार पालसिंगणकर हे देखील मुलाखत देण्यासाठी व नेत्यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी २ कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. नेत्यांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला.

आमचा अंतर्गत विषय- पालसिंगणकर
हा आमचा अंतर्गत विषय आहे. मात्र, घडलेला प्रकार खरा असून, या संदर्भातील सर्व कल्पना महाराष्ट्र राज्याचे संघटन प्रमुख व सरचिटणीस विजय पुराणिक व इतर ज्येष्ठ नेत्यांना दिली आहे. ते योग्य तो निर्णय घेतील असे पालसिंगणकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details