बीड:बीडच्या गेवराई तालुक्यात आत्महत्यांचे सत्र चालूच आहे. (Suicide In Gevrai). गेवराई मधील धोंडराई व तलवाडा मधील भोगलगाव येथे दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. (Two farmers committed suicide). या दोन्ही शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून गळफास लाऊन आत्महत्या केली आहे.
Farmers Suicide: बीडमध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या - farmers committed suicide
बीडच्या गेवराई तालुक्यात आत्महत्यांचे सत्र चालूच आहे. (Suicide In Gevrai). गेवराई मधील धोंडराई व तलवाडा मधील भोगलगाव येथे दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. (Two farmers committed suicide).
पिकांच्या नुकसानीमुळे आत्महत्या: गेवराई पोलीस स्टेशन हद्दीतील धोंडराई येथील अमोल रानमारे (वय २४ वर्ष) तर भोगलगाव येथील अर्जुन धोत्रे (वय ४० वर्ष) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. दोन्ही शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीमुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच भोगलगाव येथील घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भुतेकर व पोलीस जमादार नवनाथ डोंगरे तर धोंडराई येथील घटनास्थळी पोलीस जमादार दत्ता उबाळे दाखल झाले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत.