महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beed Rape Case: वहिणीचा अंघोळीचा व्हिडीओ केला रेकॉर्ड; दिरांकडून भावजयीवर अत्याचार, दोघांना अटक - Two close Relatives Arrested

बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील एका विवाहित महिलेवर तिच्या दोन दिरांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन्ही दिरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

40 rapes and 322 molestations in Beed
जिल्ह्यात 13 महिन्यात 140 बलात्कार तर 322 विनयभंग

By

Published : Feb 7, 2023, 11:38 AM IST

बीड :महिलेचा पती बाहेरगावी असताना पाच ते सहा महिन्यापूर्वी एक दीर एकदा घरी आला होता. त्याने मोबाईलमध्ये महिला आंघोळ करतानाचा फोटो आणि व्हिडिओ काढलेले दाखवले. शारीरिक संबंध ठेवले नाही तर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकीन अशी धमकी त्याने दिली. महिलेने अनेकवेळा नकार दिला. त्यावेळस पीडीतेच्या मुलास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार महिलेने तिच्या सासऱ्यांना सांगितला तर त्यांनी सांगितले की माझा मुलावर विश्वास आहे. नंतर दिराने एकटीला बघून बळजबरी केली. नंतर त्याने मावसभावाला घरी आणले. त्यानेही बळजबरी केली, असे पीडितेने पोलिसांना फिर्याद देताना सांगितले.


आरोपीला ठोकल्या बेड्या :पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध 376(2), 323, 506 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास गेवराई पोलीस स्टेशनचे शिवाजी भुतेकर करत आहेत.



जिल्ह्यात विकृती वाढली आहे: जानेवारी 2022 मध्ये एका महिन्यात 11 बलात्कार तर 19 विनयभंग झाले आहेत. फेब्रुवारीत 09 बलात्कार तर 22 विनयभंगाच्या घटना नोंद आहेत. मार्च मध्ये 07 बलात्कार 31 विनयभंगाच्या घटनेची नोंद आहे. एप्रिल मध्ये 17 बलात्कार 34 विनयभंगाची नोंद आहे. मे मध्ये 12 बलात्कार 31 विनयभंग, जूनमध्ये 14 बलात्कार 35 विनयभंग , जुलैमध्ये 07 बलात्कार 23 विनयभंग, ऑगस्टमध्ये 13 बलात्कार 20 विनयभंग, सप्टेंबरमध्ये 08 बलात्कार 24 विनयभंग , ऑक्टोबरमध्ये 12 बलात्कार 25 विनयभंग, नोव्हेंबर मध्ये 16 बलात्कार 24 विनयभंग, डिसेंबर मध्ये 13 बलात्कार 24 विनयभंग, जानेवारी 2023 मध्ये 01 बलात्कार 10 विनयभंग, फेब्रुवारीत 01 बलात्कार असे एकूण 140 बलात्कारच्या व 322 विनयभंगच्या घटना एवढ्या गुन्ह्यांची नोंद पोलिसात झाली आहे. त्यामुळे आता महिला आणि मुली घरातही आणि घराच्याही बाहेर असुरक्षित आहेत.

बीडमध्ये आणखी एक घटना: दिनांक 3 फेब्रुवारीला बीडमध्ये आणखी एक गुन्हा घडला होता. माजलगाव तालुक्यातील गावामध्ये मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना होती. पहाटेच्या साखरझोपेत असलेल्या बापावर खोऱ्याच्या तुंब्याने डोक्यावर घाव करून खून केल्याची घटना गुरुवारी माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान घडली होती. आरोपी मुलास माजलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे होते.

हेही वाचा: Beed Crime : भोळसर मुलाने डोक्यात खोरे घालून केली जन्मदात्या बापाची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details